
राहुल ससाणे
देशभरातील केंद्रीय व राज्य विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि विशेषतः महाराष्ट्रातील सरकारी महत्त्वाच्या विद्यापीठांत सध्या कशा प्रकारे, कोणत्या दर्जाचे संशोधनकार्य होत आहे, याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालयांना संशोधनकेंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांना मान्यता देत असताना विद्यापीठ प्रशासनाने कोणत्या निकषांचा आधार घेतला आहे? सर्वात महत्त्वाचा, मूलभूत निकष म्हणजे ग्रंथालयांची सुविधा. पण ती पुरेशी नाही. अनेक ठिकाणी केवळ पदवीधर विद्यार्थ्यांसाठीच पुस्तके उपलब्ध असतात. अशा ठिकाणी मूलभूत संदर्भग्रंथ मिळत नाहीत. त्यांचा कार्य कालावधी मर्यादित असतो. त्यामुळे दिवसभर ग्रंथालयात बसण्यासाठी मर्यादा येतात. पीएच.डीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासकक्ष नाहीत.