‘मरहट्ट्याचा हट्ट खरा’

याचे कारण त्यामागे साहित्यनिर्मितीसंदर्भातील तात्त्विक भूमिकेविषयी मतभेद होता. हे वाद केवळ भाषेच्या पृष्ठभागावर खेळले गेले नव्हते.
‘मरहट्ट्याचा हट्ट  खरा’
‘मरहट्ट्याचा हट्ट खरा’
Updated on

डाॅ. नीलिमा गुंडी

म राठीची नाळ ‘महाराष्ट्री प्राकृत’शी जुळलेली आहे, हे कवी वसंत बापट यांनी ओळखले होते. त्यांनी ‘केवळ माझा सह्यकडा’ या कवितेत म्हटले आहे :

‘ माझ्यासाठी राहील गाठी,

मरहट्ट्याचा हट्ट खरा’

यात हाल नामक सातवाहन राजाच्या काळात मराठी भाषेचा ‘मरहट्ठ देसी भाषा’ असा झालेला उल्लेख मार्मिकपणे नोंदवला आहे . यात मराठीच्या जनुकात आढळणारा संवेदनस्वभाव जणू टिपला आहे . हट्ट म्हणजे बौद्धिक खुमखुमी, वैचारिक पिळदारपणा होय.

उद्योतनसूरीच्या ‘कुवलयमाला’ या आठव्या शतकातील ग्रंथातही ‘कलहसीले, दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे’ असा उल्लेख आहे. या ‘दिले-घेतले’ असे रोखठोक म्हणणाऱ्या वृत्तीचा वसा पुढे मराठीच्या वादपरंपरेत अधिक तेजस्वीपणे उजळून निघालेला दिसतो. आपल्या शाहिरी काव्यातही सवाल-जबाब हा प्रकार लोकप्रिय आहे. त्याहीआधी आपल्याकडील संतवाङ्मयातही या वृत्तीचे कवडसे उमटले आहेत. वारकरी संप्रदायाचे संत कवी चोखामेळा यांनी आध्यात्मिक पातळीवरून समाजाला विचारलेला प्रश्न आहे : ‘ विटाळापरते आहे कोण?’ तसेच संत एकनाथ यांनी तत्कालीन व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे : ‘ संस्कृत वाणी देवें केली, प्राकृत काय चोरापासोनि झाली? '' हे प्रश्न धारदार आहेत. संत तुकाराम यांनी तर ‘आपुलाचि वाद आपणासि’ असे म्हणत वाद तत्त्वचिंतनाच्या पातळीवर नेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com