

Abhivyaktee Swatantrya
sakal
इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांचा ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’ हा चित्रपट ‘इफ्फी’मध्ये पाहताना समजून गेले होते, की जाफर पनाही यांना पुन्हा एकदा शिक्षा ठोठावण्यासाठी हा चित्रपट पुरेसे निमित्त ठरू शकतो आणि तसेच घडले. त्यामुळे पनाही यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल ऐकून चित्रपट जगताशी संबंधित व्यक्तींना अजिबात आश्चर्य वाटले नसणार. हा चित्रपट ज्यांनी बघितला, त्यांना या शिक्षेबद्दल नक्कीच अंदाज आला असणार.