
Artificial Intelligence
sakal
आरसिन तांबोळी
जसप्रीत बिंद्रा यांनी केंब्रिज विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नैतिकता यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, ‘एआय’चा उपयोग संकल्पना सोप्या करण्यासाठी निश्चित करता येतो. मात्र तिचा वापर करताना माणसाच्या मूलभूत अधिकारांची, गोपनीयतेची आणि सामाजिक समतेची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. ‘एआय’मधील पूर्वग्रह, चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता आणि समाजातील डिजिटल दरी आणखी वाढण्याचा धोका असल्याचेही ते सांगतात.