

AYUSH Ministry
sakal
डॉ. उमेश तागडे
भारताची आरोग्य परंपरा ही हजारो वर्षांची, शास्त्राधिष्ठित आणि जीवनाभिमुख आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता, मानसिक तणाव व श्वसनविकार यांसारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे महत्त्व पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित होत आहे. आयुष मंत्रालयाशिवाय महाराष्ट्राचे आरोग्य भवितव्य सुरक्षित नाही, हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आता आली आहे.