agriculture loss by heavy rain
sakal
‘जगाचा पोशिंदा’, ‘बळिराजा’, अशी कितीही विशेषणे लावली तरी सध्याची शेतकऱ्यांची अवस्था शब्दांत मांडणे अवघड आहे. पावसाने होत्याचं नव्हतं केलं. पण अजून सरकारकडून ठोस असा कुठलाच निर्णय होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथे जाहीर सभेत बोलताना त्यांनी ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तातडीने मदत करतील’, असे जाहीर केले. आता या विधानात शेतकऱ्यांसाठी आश्वासक असे काहीच नाही.