
अर्थ, गृह, महसूल ही तीन खाती सर्वाधिक महत्त्वाची. सिंचन, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या स्तरावरची. त्यातील किती पदरी पाडून घेतली जाऊ शकतात, त्याचा अंदाज सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असावेत.
कल्पनेपेक्षा वास्तव वेगळे असते, ते पटले नाही तरी स्वीकारावे लागते. महाराष्ट्रात लोकसभेतल्या निकालांचा उलटफेर झाला, तो का हे आता शोधले जाते आहे. मतयंत्रांनी महायुतीला जिंकवले की महायुतीने ते आता शोधले जाणार आहे. अशा मागण्यांमुळे जो बुद्धिभ्रम तयार होतो, तो सोडवत यंत्रणेवरचा जनतेचा विश्वास उडू नये, यासाठी निवडणूक आयोगाला पावले उचलणे गरजेचे आहे. यंत्रे निर्दोष आहेत हे जनतेला समजावून सांगणे आवश्यक आहे.