
दीपा कदम
राजकारण हा बुद्धिबळाच्या पटावरचा खेळ म्हणून ओळखला जातो पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा स्तर हा बुद्धिबळापेक्षा ‘रमी’च्या तोडीचा अधिक आहे, असे म्हणावे लागेल. बुद्धिबळात सर्व डाव हे खुल्या पटावर टाकले जातात, ‘रमी’मध्ये तसे होत नाही. काही गोष्टी पानात दडलेल्या असतात तर काही समोरच्याच्या चालीत. राज्याच्या राजकारणाची अवस्थाही काहीशी तशीच आहे.