
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात सादर केलेले ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करत या विधेयकाला विरोध जाहीर केला होता. मात्र विधानसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव सदस्य कॉ. विनोद निकोले यांनीच फक्त विरोध केला. अशाप्रकारे विरोधकांनी जणू सरकारला ‘केक वॉक’ दिला. समाजमाध्यमांतून झालेल्या तीव्र विरोधानंतर संयुक्त समिती नेमून तरतुदींत काही सुधारणा करण्यात आल्या.