
महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायची इच्छा आहे. बीडचे प्रकरण गाजते आहे. नवे सरकार सत्तारुढ झाले अन् मंत्र्यांना कक्ष,बंगले मिळण्याआधीच ‘गॅंग्ज ऑफ बीड’चे कवित्व सुरु झाले. कायदा हातात घेणाऱ्यांना जेरबंद करा, या मागणीसाठीचे सर्वपक्षीय मोर्चे केवळ बीडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत; तर या गुंडशाहीला विरोध करायला लोक पुण्यातही रस्त्यावर उतरले. नवे सरकार या प्रकाराकडे लक्ष ठेवून असेलच.