चालून आलेली संधी 

आसावरी काकडे 
सोमवार, 8 जानेवारी 2018

मनात काहीतरी सलत राहिलं. खरं तर मी तिला रागावून काही बोलले नव्हते. तिनं आणलेल्या वस्तू नको असताना, 
घासाघीस न करता घेतल्या होत्या. सुटे पैसे दिले होते. तक्रार करावी असं काही केलं नव्हतं... पण आजकाल कुणाचं काय सांगता येतं? या भीतीपोटी तिला मी घरात घेतलं नव्हतं. तिला 
गरज असताना आणि मला ते जाणवलेलं असतानाही पाणी दिलं नव्हतं... वस्तू घेतल्या, घासाघीस केली नाही, सुटे पैसे दिले, कारण मला ती लवकर जायला हवी होती.

कुणी येण्याची ती वेळ नव्हती. पण अचानक दार वाजलं. कोण असेल? असा विचार करत दार उघडलं, तर एक विक्रेती बाई दारात उभी होती. दार उघडताच, तिनं न थांबता बोलायला सुरवात केली. न जाणो मी "काही नकोय' म्हणून दार लावून घेतलं तर? पाठ झालेला मजकूर ती बोलत सुटली. मध्ये श्वास घ्यायला पण थांबत नव्हती. बोलताना थकून थांबली. तोंडाला फेस आल्यासारखा दिसला. पाणी द्यावंसं वाटलं. पण जेमतेम दार उघडलं. तिनं विकायला आणलेलं पायपुसणं, फिनेल... घासाघीस न करता घेतलं. पैसे दिले. ती गेली. दार बंद करून मी कामाला लागले. पण तिचा थकलेला, गरीब चेहरा डोळ्यांपुढं तरळत राहिला...

मनात काहीतरी सलत राहिलं. खरं तर मी तिला रागावून काही बोलले नव्हते. तिनं आणलेल्या वस्तू नको असताना, 
घासाघीस न करता घेतल्या होत्या. सुटे पैसे दिले होते. तक्रार करावी असं काही केलं नव्हतं... पण आजकाल कुणाचं काय सांगता येतं? या भीतीपोटी तिला मी घरात घेतलं नव्हतं. तिला 
गरज असताना आणि मला ते जाणवलेलं असतानाही पाणी दिलं नव्हतं... वस्तू घेतल्या, घासाघीस केली नाही, सुटे पैसे दिले, कारण मला ती लवकर जायला हवी होती. आता ती 
गेल्यावर, दार बंद केल्यावर, माझ्या सुरक्षित स्पेसमधला तिचा व्यत्यय दूर झाल्यावर मला माणुसकीच्या गोष्टी सुचत होत्या. माझा विवेक मला टोचणी देत होता. "आजकाल कुणाचं काय सांगता येतं?, कुणावर विश्वास ठेवण्याचे दिवस राहिलेले नाहीत...' ही भीती माणुसकी विसरण्याइतपत खरी होती काय? 
मनात येत राहिलं, मी तिच्याकडून वस्तू घेतल्या, त्यातून तिला दोन पैसे मिळाले असतील. 

पण मी तिला "आत या' म्हटलं असतं, विचारपूस केली असती तर पैसे सन्मानानं मिळाल्याचा दिलासा तिला मिळाला असता. माझ्या तुटक वर्तनानं, कितीही सरावली असली तरी तिच्या मनावर ओरखडा उमटलाच असेल. माझं मन तिच्याभोवती फिरू लागलं. ती किती शिकली असेल? तिच्या घरी कोण कोण असेल? कमावतं कोण असेल? की सगळी जबाबदारी तिच्यावरच असेल? पैसे मिळविण्यासाठी ती आणखी किती कष्ट उपसत असेल?... 

दारोदारी फिरून वस्तू विकणाऱ्या अशा कितीतरी बाया, मुलं, पुरुष मनासमोरून सरकत गेले आणि बरेच "लाइक्‍स' मिळालेला माझाच एक शेर आठवला- प्रत्येकाचे जगणे असते कथा अनोखी आपुलकीने परंतु कोणी वाचत नाही..! 
एक चालती-बोलती कथा आपण होऊन दारात आली होती. पण स्वतःच्या मर्यादित परिघातून बाहेर पडून, तथाकथित कल्पित भीतीला ओलांडून ती आपुलकीनं वाचायची चालून आलेली संधी मी गमावली...! 

Web Title: marathi news article editorial chalun aleli sandhi asavari kakade

टॅग्स