

Past vs. Future: Balancing Memories and Aspirations for Mental Well-being
Sakal
शिवराज गोर्ले
महान तत्त्वचिंतक बर्ट्रांड रसेल यांनी म्हटलं आहे, `आयुष्य म्हणजे तीनअंकी नाटक नव्हे- ‘शेवट गोड तर सारं गोड’ हा नियम जीवनाला लागू पडत नाही. माणूस जो क्षण जगत असतो, तो वर्तमानातला क्षण तेवढा खरा. म्हणूनच त्या त्या क्षणातलं ‘साधं सुख’ घेता येणं हे साधायला हवं!’
अर्थात त्या त्या क्षणातलं साधं सुख.. छोटे छोटे आनंद घेण्यासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाचं ओझं आणि भविष्याची चिंता या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो. ओशोंच्या मते तर वर्तमानात जगणं हाच खरा माणसाचा धर्म आहे. ते म्हणतात, ‘धर्म का संबंध न तो अतीत से है न भविष्य से । धर्म है अभी और यहीं जीना । बस, अभी और यहीं । इस क्षण के पार कुछ भी नहीं है । ‘वर्तमान’ के अतिरिक्त और किसी की कोई सत्ता नहीं है । लेकिन लोग अतीत में जीते हैं और भविष्य में उनकी वासना अटकी रहती है । जीते हैं उसमें जो अब है नहीं और आशा करते हैं उसकी जो अभी हुआ नहीं और शायद कभी होगा भी नहीं ।’