
नागपूर शहरात कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त होत आहेत. त्याच्या आहारी बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात जाण्याची भीती आहे. परवा आई-वडिलांचा खून करणारा तरुण व्यसनांमध्ये लिप्त असल्याचे स्पष्ट झाले. ही व्यसनाधीनता शहरातील घराघरांपर्यंत पोहोचण्याआधीच नष्ट होणे गरजेचे आहे.