राज्यरंग- अरुणाचल प्रदेश : सांपत्तिक उत्कर्षाचा ‘खांडू पॅटर्न’

अरुणाचलमध्ये सामरिक विकासाच्या पार्श्वभूमीवर खांडू कुटुंबाची झपाट्याने वाढलेली संपत्ती, नातेवाइकांना मिळालेली कोट्यवधींची कंत्राटे आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेला सीबीआय तपास यामुळे ‘खांडू पॅटर्न’वर नवे प्रश्नचिन्ह
"अरुणाचलच्या राजकारणात 'भ्रष्टाचाराचा' भूकंप!" पेमा खांडूंच्या नातेवाइकांसाठी कंत्राटांची खैरात? सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी.

"अरुणाचलच्या राजकारणात 'भ्रष्टाचाराचा' भूकंप!" पेमा खांडूंच्या नातेवाइकांसाठी कंत्राटांची खैरात? सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी.

Sakal

Updated on

मधुबन पिंगळे

चीन, भूतान आणि म्यानमार या तीन देशांची सीमा लागून असणारे अरुणाचल प्रदेश म्हणजे देशातील सामरिक दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक. चीनची घुसखोरी किंवा चीनकडून सातत्याने सांगितला जाणारा दावा यांमुळे अधूनमधून चर्चेत येणारे हे राज्य आता तेथील सरकारविरोधातील गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या निकटच्या नातेवाइकांनाच अनेक कंत्राटे बहाल केल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणांवर प्राथमिक तपास करून १६ आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ‘सीबीआय’च्या तपासामध्ये काही निष्पन्न होणार की नाही, ही बाब अलाहिदा असली, तरीही या प्रकरणावरून पेमा खांडू चर्चेत आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com