हरित व खात्रीशीर ऊर्जेचा आश्वासक पर्याय

Pumped Storage Hydropower Projects in India : भारताची वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. सौर आणि पवन ऊर्जेची साठवणूक करून गरजेच्या वेळी वीजपुरवठा करण्याची क्षमता या प्रकल्पांत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प प्रस्तावित आहेत.
Pumped Storage Hydropower Projects in India

Pumped Storage Hydropower Projects in India

esakal

Updated on: 

विकसनशील देश असल्यामुळे भारताची ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु त्यावरील परावलंबित्व कमी करणे आणि खनिज ऊर्जेमुळे होणारे प्रदूषणही कमी करण्यासाठी पर्यायी ऊर्जास्रोतांची चाचपणी भारत करत आहे. पंप्ड स्टोरेज प्रकल्प हा त्यांपैकीच एक. अलीकडे चर्चेत आलेल्या या ऊर्जापर्यायावरील हा दृष्टिक्षेप. डॉ. रवींद्र उटगीकर

आर्थिक विकास आणि पर्यावरण रक्षण हे परस्परविरोधी दिशेने जाणारे विषय नाहीत. दीर्घकालीन हित पाहिले, तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेन्री पॉलमन (अमेरिकेचे माजी अर्थमंत्री आणि शाश्वत विकासाचे पुरस्कर्ते)

एकीकडे विकासाला चालना देण्यासाठी ऊर्जेची वाढती गरज आणि दुसरीकडे प्रदूषणकारी खनिज ऊर्जेला पर्याय शोधून स्वच्छ व हरित पर्यायांकडे संक्रमण करण्याची जबाबदारी असा दुहेरी बोजा भारताला सध्या पेलावा लागत आहे. भू-राजकीय अस्थिरता आणि आखातातील युद्धस्थिती यांमुळे हे आव्हान बिकट होत आहे. त्यावर उत्तर शोधताना प्रत्येक देशाला आपल्या अंतर्गत मागणी-पुरवठ्याच्या व्यस्त गणिताचे कोडे सोडवावे लागत आहे.

Loading content, please wait...