चळवळ मनोबल वाढविण्याची

raja-akash
raja-akash

स्वत:च्या जीवनाविषयी, करिअरविषयी, अभ्यासाविषयी, वागणुकीविषयी, ध्येयाविषयी शेकडो प्रश्‍न आपल्या मनात निर्माण होत असतात. हे प्रश्‍न, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता ही तुमची शक्‍ती आहे. ही शक्‍ती मनात निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यास, त्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्यास मदत करते. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांनी आपण अस्वस्थ होत असतो, त्या वेळी ती अस्वस्थता आपल्याला त्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यास मदत करते. सततच्या प्रयत्नांतून आपल्याला त्या प्रश्‍नांची उत्तरं सापडतात. पण उत्तरं शोधण्याच्या प्रक्रियेत आणखी नवीन प्रश्‍न मनात निर्माण होतात. परत त्या प्रश्‍नांची उत्तरं शोधायची असतात. ही अस्वस्थता जपायची असते. त्यातून मिळणाऱ्या शक्‍तीचा उपयोग जीवनात यशस्वी होण्यासाठी करून घ्यायचा असतो. मनातल्या प्रश्‍नांमुळे अस्वस्थ होणारे आपण एकटे नाही. आजूबाजूला नजर टाकली तर आपल्यासारखे अस्वस्थ लोक भरपूर दिसतील. त्यांच्याशी मैत्री करावी. कारण एकाच प्रश्‍नांमुळे अस्वस्थ झालेले लोक मनानं एकमेकांच्या चटकन जवळ येतात. त्यांच्यात दृढ भावनिक बंध तयार होतो. मग प्रश्‍नांची उत्तरं शोधणारे आपण एकटे राहत नाही.

आपल्याला सोबती मिळतात. आपली शक्‍ती वाढते. मित्रांनो, त्यामागं एक साधं तत्त्व आहे. एक काडी सहज मोडता येते, पण ५-६ काड्या एकत्र बांधल्या तर त्या मोडणं अशक्‍य होतं. आपण एकमेकांशी मैत्री करायला घाबरतो. आपल्या जवळची माहिती, ज्ञान इतरांपासून लपवून ठेवतो. प्रत्येक जण असाच वागतो. आपल्याकडील माहिती लपवून ठेवतो व दुसऱ्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतो. पण इतर लोकही चलाख असतात. ते त्यांचं ज्ञान आपल्यापासून लपवून ठेवतात. त्यामुळे प्रत्येकाच्या ज्ञानाच्या कक्षा मर्यादित राहतात. त्यात फारशी प्रगती होत नाही. स्वत:च्या परिश्रमातून थोडीफार झाली तरच. जो इतरांना मदत करतो त्याला सर्व जण मदत करतात. त्याचे प्रश्‍न सोडवण्यास इतरांचाही हातभार लागतो, असा माणूस प्रगती करतो. मित्रांनो, सर्वकाही चोरीला जाऊ शकतं, पण ज्ञान कधीच चोरीला जात नाही. म्हणून ही दौलत आपल्याला सतत वाढवायची आहे. 

मित्रांनो, जो विचार मी लेखांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवतो ती एक चळवळ आहे. हे विचार लोकांच्या मनात रुजणं, त्यांनी स्वत:चं सामर्थ्य वाढवणं, जीवनात यशाच्या शिखराकडे वाटचाल करणं, त्यासाठी मानसिक बळ वाढवणं, हा या चळवळीचा उद्देश. आज आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहेत. थोडा मोकळा वेळ मिळाला, तरी तो वेळ मोबाईलवर नॉनप्रॉडक्‍टिव्ह गोष्टी करण्यात खर्च होतो. याचा अतिरेक झाला, तर नुकसान आपलंच आहे. म्हणून दिवसातला थोडातरी वेळ सर्जनशील कामासाठी वापरला पाहिजे. हे आपण व आपली मित्रमंडळी एकत्र येऊन करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com