esakal | जीवनाच्या छटा टिपणारे चित्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

art.

पॅरिसला जिवाची पंढरी केल्यावर ‘कुलदेवते’चे दर्शन घ्यायला आम्ही ॲम्स्टरडॅमला गेलो. रेम्ब्रांट हे माझ्या चित्रकार नवऱ्याचे कुलदैवत आणि व्हॅन गॉग आमचे ग्रामदैवत म्हणालात तरी चालेल.

जीवनाच्या छटा टिपणारे चित्रकार

sakal_logo
By
गायत्री देशपांडे

पॅरिसला जिवाची पंढरी केल्यावर ‘कुलदेवते’चे दर्शन घ्यायला आम्ही ॲम्स्टरडॅमला गेलो. रेम्ब्रांट हे माझ्या चित्रकार नवऱ्याचे कुलदैवत आणि व्हॅन गॉग आमचे ग्रामदैवत म्हणालात तरी चालेल. रेम्ब्रांटचे तिथले म्युझियमवजा घर बघताना तर आम्ही त्या काळात हरवूनच गेलो. जवळपास ६० सेल्फ पोर्ट्रेट करणाऱ्या या कलंदरांनी तो काळ गाजवला असणार यात शंका नाही. डच सुवर्णकाळातील बारोक पेंटर आणि प्रिंटमेकर अशी ख्याती असलेल्या रेम्ब्रांटनी त्याच्या चित्रांतून अक्षरशः नाट्यमय कथाकथनच केलेले जाणवते. या वास्तववादी चित्रकाराच्या कलाकृतींमध्ये छायाप्रकाशाचा खेळ ही जमेची बाजू दिसून येते. जास्त करून व्यक्तिचित्रांत रमणाऱ्या रेम्ब्रांटनी बायबल व पुराणकथांचे चित्रिकरणही केले. त्यांनी केलेल्या प्रत्येक व्यक्तिचित्रात त्याची एक चित्रकार म्हणून झालेली प्रगती अगदी टप्प्याटप्प्याने दिसते. तंत्र व माध्यम यांचा अचूक वापर करून घडवलेले व्यक्तिचित्र आपल्याला मोहून टाकतात. एका बाजूने पडलेला स्पॉटलाईट आणि दुसरा भाग अंधारात चित्रित करताना निवडलेले रंग, त्या रंगांचे लेपन, पोत हे सर्व अतिशय आकर्षक दिसते. त्यातून केवळ त्याचे कौशल्यच नव्हे तर चित्रिकरणातील संवेदनशीलताही दिसते.

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 प्रत्येक चित्रात त्याने केलेल्या नवनवीन प्रयोगांचे पुरावे त्याच्या सृजनशीलतेबद्दल बरेच काही सांगून जातात. प्रकाशाचा चित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेम्ब्रांटची रंगांची निवड त्याच्या चित्रात एक वेगळीच खोली निर्माण करते. त्याच्या चित्रांतील छाया असमान सोनेरी रंगांच्या ब्रशच्या जाड व जोरकस फटकाऱ्यांनी कशा चित्राच्या पार्श्‍वभूमीत विलीन होताना दिसतात. कधीकधी अतिशय जाड रंग-लेपन, कधी अगदी पातळ रंग, तर कधी ब्रशच्या मागच्या टोकाने खरवडून काढलेले रंग अशा आवश्‍यक त्या तंत्राने हवा तो परिणाम साधायला तो प्रयोगशील होता. रेम्ब्रांटची चित्रे मला अतिशय ‘नाट्यमय’ वाटतात आणि हाच ‘ड्रामा’ त्यांना नयनरम्य आणि विशेष बनवतो. एकीकडे रेम्ब्रांट तर दुसरीकडे याच मायभूमीतला पोस्ट इंप्रेशनिझम काळातला एक झपाटलेला रंगवेडा विन्सेंट व्हॅन गॉग व त्याचे भावविश्‍व - व्हॅन गॉग म्युझियम. व्हॅन गॉग म्हटलं की काहींना आठवते ती ‘स्टारी नाईट’ तर काहींना त्याचे सेल्फ पोर्ट्रेट. माझ्या मनाला भिडतात ते त्याचे ‘सनफ्लावर्स्‌’. एकूण ११/१२ कॅन्व्हासची ही मालिका आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही छोटेमोठे फरक सोडले तर सर्व कॅन्व्हासमधील रचना साधारण सारखीच. ही सीरिज व्हॅन गॉगच्या नावाशी जणू एकरूप झाली - एक समीकरणासारखी. चित्रकार मित्रासाठी सुरू केलेली ही मालिका स्वतः व्हॅन गॉगला अतिशय प्रिय होती. यातील तेजस्वी क्रोम यलो आकर्षक रंग आहे. या चित्रांतील रंग जणू त्या सूर्यफुलांच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहेत. टवटवीत सूर्यफुलांचा तेजस्वी पिवळा, तर काही मलूल झालेल्यांचा ब्राऊन. सर्व जीवनाच्या छटाच जणू. या चित्रमालिकेचा काळ हा व्हॅन गॉगच्या आयुष्यातला आनंदी काळ होता, हे त्या पिवळ्या रंगांच्या उपयोगातून स्पष्ट दिसते. यात अनेक तंत्रांचा वापरही दिसतो - पॉईन्टलिस्ट ते जाड रंगलेपन. त्या काळातील विशिष्ट रंग-लेपनाच्या पद्धतीला छेद दिल्याचेही दिसते.ही चित्र वास्तवाचे हुबेहूब चित्रण नसून त्यात चित्रकाराची अभिव्यक्ती प्रामुख्याने दिसते. एकाच चित्रात एकाच रंगाचा - पिवळा - विविध छटांमध्ये वापर यशस्वी ठरवून चित्रांतून जणू प्रकाश परावर्तीत होतो. प्रत्येक चित्र कसे उठून दिसते, एकसारखी रचना असूनही ॲम्स्टरडॅमनंतरही मालिका बघायला मुद्दाम लंडनला दौरा नेला - नॅशनल गॅलेरीत. मोठ्या खेळण्याच्या दुकानातल्या एका लहान मुलासारखी अवस्था झाली आमची. काय काय बघावं? इथला मुक्काम वाढवावाच लागला!

loading image