राजदूतांचे मृत्यू नैसर्गिक की घातपाती?

गेल्या चार वर्षांत चीनशी संबंधित चार राजदूतांचे मृत्यू झाले. ते नैसर्गिक आहेत, की घातपाती याविषयी संशय व्यक्त होत आहे.
ambassador
ambassadorsakal
Summary

गेल्या चार वर्षांत चीनशी संबंधित चार राजदूतांचे मृत्यू झाले. ते नैसर्गिक आहेत, की घातपाती याविषयी संशय व्यक्त होत आहे.

गेल्या चार वर्षांत चीनशी संबंधित चार राजदूतांचे मृत्यू झाले. ते नैसर्गिक आहेत, की घातपाती याविषयी संशय व्यक्त होत आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांत होणारे चीनविषयीचे वार्तांकन एकारलेले असण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊनही राजदूतांच्या या मृत्यूविषयी संशय आल्याशिवाया राहात नाही, हेही खरे.

फिलिपिन्सचे चीनमधील राजदूत (सान्तियागो रोमाना)

चीनच्या इतिहासाचा आणि तेथील लोकांच्या चालीरितींचा अभ्यास असणाऱ्या ७४ वर्षांच्या जोस सान्तियागो यांची सात डिसेंबर २०१६ला चीनमधील फिलिपिन्सचे राजदूत म्हणून नेमणूक झाली होती. चीनबरोबर सागरी सीमांचा वाद चालू असतानासुद्धा सान्तियागो यांनी फिलिपिन्स आणि चीनमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मागील वर्षी कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात पूर्व चीनमध्ये एका हॉटेलमध्ये क्वारनटिनमध्ये असतानाच सान्तियागो यांचा मृत्यू झाला होता. त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली होती का यांची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

म्यानमारचे चीनमधील राजदूत यू म्यो थांत पे

यू म्यो थांत पे हे म्यानमारचे चीनमधील राजदूत होते. त्यांचा ऑगस्टमध्ये महिन्याच्या पहिल्या रविवारी चीनमध्ये असतानाच मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. चिनी अधिकाऱ्यांकडून हार्ट अटॅकचे कारण सांगितले गेले होते. यू म्यो थांत पे यांची २०१९ मध्ये नेमणूक झाली होती. २०२१ मध्ये म्यानमारमध्ये लष्कराने ताबा घेतल्यानंतरही यू म्यो थांत पे यांची नेमणूक कायम होती. गेल्या वर्षभरात चीनमध्ये कार्यरत असताना हे अलीकडील काळात मृत्यू झालेले चौथे राजदूत होते.

युक्रेनचे चीनमधील राजदूत सेरही कामिशेव

युक्रेनचे चीनमधील राजदूत सेरही कामिशेव हे ६५ वर्षांचे होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांचा चीनमध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्येच चीनमधील हिवाळी ऑलिम्पिक्सच्या ठिकाणी भेट दिली होती. चीनमध्ये राजदूताच्या जागेवर नेमणूक झाल्यावर २ आठवड्यातच त्यांच्या मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २४ पासूनच रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे.

जर्मनीचे चीनमधील राजदूत यान हेकार्ट

जर्मनीचे चीनमधील राजदूत यान हेकार्ट या ५४ वर्षे वयाच्या राजदूतांचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनमध्ये कार्यरत असतानाच मृत्यू झाला होता. राजदूताच्या जागेवर नेमणूक झाल्यानंतर व कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. जर्मनीच्या या पूर्वीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या विश्वासातील ही व्यक्ती होती. अँजेला मर्केल यांचे ते परराष्ट्र धोरण सल्लागार होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. २४ ऑगस्ट २०२१ ला त्यांनी त्यांचा राजदूताचा कार्यभार स्वीकारला होता. ते जर्मनीचे चीनमध्ये नियुक्त झालेले १४ वे राजदूत होते. हेकार्ट यांनी जर्मनीच्या चीनबरोबरील दीर्घ आणि स्थिर राजनैतिक संबंध विकसित करण्यास प्रयत्न करण्यास प्राधान्य दिले होते. जर्मनीमध्ये त्यांनी २०१५ मध्ये निर्वासित म्हणून जर्मनीमध्ये आलेल्या लोकांच्या पुनर्वसन धोरणात भाग घेतला होता. नुकतेच म्हणजे अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतरच्या काळात तैवानच्या लष्कराच्या क्षेपणास्त्र विभागाचे ( संशोधन आणि विकास ) प्रमुख अधिकारी यांग ली हसींग ( नेशनल चिंग शान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एन्ड टेक्नोलोंजि ) ह्या ५७ वर्षांच्या उच्च अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. दक्षिण तैवानच्या हॉटेलमध्ये ते मृतावस्थेत आढळले होते.

आबे यांच्या हत्येचे गूढ

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आंबे यांची जपानमध्ये झालेली हत्या याचेही गूढ उकललेले नाही. क्वाडची संकल्पना पुढे आणण्याचे श्रेय पूर्णपणे जाते शिंजो आबे यांच्याकडेच. चीनचा भविष्यात उद्भवणारा धोका शिंजो आबे यांनी वेळीच ओळखला होता. जपानच्या संसदेमध्ये २/३ बहुमतासाठी आणि जपानला स्व संरक्षणासाठी सैन्यदलांची उभारणी करण्यासाठी आणि विविध शस्त्रास्त्र उत्पादनाच्या मानसिक तयारीसाठी शिंजो आबे हे वेळोवेळी विरोध सहन करूनही त्यांची भूमिका रेटत राहिले आणि त्या भूमिकेवर संसदेची मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचाराचा धडाका लावला होता.

तैवानवर जर चीनने आक्रमण केले तर ते जपानवरील आक्रमण समजले जाईल एवढ्या स्पष्टपणे शिंजो आबे यांनी चीनला संदेश दिला होता. शिंजो आंबे यांच्या हत्येनंतर चीनमधील समाजमाध्यमांवर ( वेबो आणि इतर ) चीनमधील अनेक नागरिकांकडून व्यक्त केलेला आनंदोत्सव पाहता त्यापेक्षा चिनी राज्यकर्त्यांची भूमिका वेगळी असू शकत नाही, असा संदेश जगभर गेलेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com