नाममुद्रा : कलेचा उपासक अन् प्रसारक

वेगवेगळ्या वाद्यांतून निर्माण होणारे संगीत, त्याचा नाद कानांना लुभावतो. अशाच एका हटके वाद्यातून सांगीतिक क्षेत्रात नाव उज्ज्वल करणारे नाव म्हणजे पंडित भीमण्णा जाधव.
Bhimanna Jadhav
Bhimanna JadhavSakal
Summary

वेगवेगळ्या वाद्यांतून निर्माण होणारे संगीत, त्याचा नाद कानांना लुभावतो. अशाच एका हटके वाद्यातून सांगीतिक क्षेत्रात नाव उज्ज्वल करणारे नाव म्हणजे पंडित भीमण्णा जाधव.

वेगवेगळ्या वाद्यांतून निर्माण होणारे संगीत, त्याचा नाद कानांना लुभावतो. अशाच एका हटके वाद्यातून सांगीतिक क्षेत्रात नाव उज्ज्वल करणारे नाव म्हणजे पंडित भीमण्णा जाधव. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भीमण्णा यांनी ‘सुंद्री’वादनाचा छंद जोपासला. त्यांना नुकताच मध्य प्रदेश सांस्कृतिक कला परिषद आणि उस्ताद अल्लाउद्दीन खाँ संगीत अकादमीच्या विद्यमाने ‘पद्मश्री उस्ताद लतीफ खाँ पुरस्कार’ने गौरवण्यात आले.

सुंद्री या वाद्याच्या शोधाची कहाणी मनोरंजक आहे. १८९५ पूर्वी एक बॉबिन (हातमागाचे कापड विणण्यासाठी धागा वळवण्यासाठी वापरला जाणारा लाकडी किंवा पुठ्ठ्याचा पाइप) भीमण्णांचे आजोबा बाबूराव आणि सिद्राम जाधव यांनी घरी आणला. बाबूराव यांनी त्याला आठ छिद्रे पाडली व त्याची ट्यूनिंग चाचणी केली. त्याचा आवाज त्यांच्या कानाला खूप आनंददायी वाटला. सुरुवातीला सोलापूरच्या लोकांनी या वाद्याचे नाव ‘बॉबिन’ ठेवले. २७ फेब्रुवारी १९३६ रोजी अक्कलकोटचे राजे महाराज फत्तेसिंह यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने बाबूराव जाधव यांना सुंद्रीवादनासाठी आमंत्रित करण्यात आले. महाराजांना हे वाद्य आवडले. या वाद्याने ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी या वाद्याला ‘सुंद्री’ असे नाव बहाल केले.

भीमण्णा यांनी आजोबा सुंद्री सम्राट पंडित सिद्राम जाधव, वडील चिदानंद यांच्याकडून सुंद्री वाजवण्याचे शिक्षण-प्रशिक्षण घेतले. ते दोघेही सुंद्रीचे महान उस्ताद होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि भक्तीमुळे ‘सुंद्री’ भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्यांच्या यादीत समाविष्ट होण्यास मदत झाली, असे भीमण्णा मानतात. भीमण्णा यांनी या अद्वितीय पारंपरिक वाद्याचा प्रचार, प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला आणि तो अजून सुरूच आहे. पंडित भीमण्णा जाधव जागतिक दर्जाचे सुंद्रीवादक आहेत. चार वर्षांचे असल्यापासून ते ‘सुंद्री’शी निगडित आहेत. सातव्या वर्षी त्यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून आपली कला सादर करत ‘सुंद्री’ वादनाच्या क्षेत्रात सार्वजनिकरीत्या पदार्पण केले. ‘सुंद्री’ या वाद्याचा जाधव कुटुंबीयांनी शोध लावून त्याचे जतन आणि संवर्धन केले; पण पुढच्या पिढीचे पंडित भीमण्णा यांनी भारताच्या सीमा ओलांडून सुंद्रीचा परदेशातही प्रसार केला. फ्रान्स, बेल्जियममध्येही त्यांनी कला सादर केली. भीमण्णा हे ‘इंडियन कल्चरल कौन्सिल ऑफ रिलेशन’ आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या पॅनेलवरील कलाकार आहेत. सुंद्री या वाद्याचा प्रचार आणि संमेलनासाठीही भीमण्णा यांचे नाव सांस्कृतिक मंत्रालयाने स्वतंत्रपणे समाविष्ट करत या कलेचा गौरव केला आहे.

संगीताच्या क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेस महत्त्व असते. भीमण्णा यांनी महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी ऑफ म्युझिक, डान्स, ड्रामा तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे अनेक शिष्यांना ‘सुंद्री’चे प्रशिक्षण दिले. आहे.

देश-परदेशात आयोजित अनेक प्रतिष्ठित संगीत मैफलींमध्ये भीमण्णा यांनी सहभाग नोंदवला आहे. सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांच्या नावे दरवर्षी भारतातील गायन, वादन, नृत्य क्षेत्रातील युवा प्रतिभाशाली कलावंतांना सुंद्रीसम्राट पुरस्कारने सन्मानित केले जाते. सुंद्रीच्या प्रसारासाठी सुंद्रीसम्राट (कै.) सिद्राम जाधव व पंडित चिदानंद जाधव संगीत विद्यालयही सोलापुरात स्थापन केले आहे. तरुणांचा सुंद्रीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com