नर्मदा खोऱ्यातील आदिवासींच्या शिक्षणाला हवाय आधार!

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित २४५ गावांच्या विकासासाठी व आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ ही स्वयंसेवी संस्था काम करते.
नर्मदा खोऱ्यातील आदिवासींच्या शिक्षणाला हवाय आधार!
नर्मदा खोऱ्यातील आदिवासींच्या शिक्षणाला हवाय आधार!sakal
Updated on

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित २४५ गावांच्या विकासासाठी व आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ ही स्वयंसेवी संस्था काम करते. या संस्थेमार्फत विस्थापित झालेल्या नर्मदा खोऱ्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रात सहा निवासी ‘जीवनशाळा’ चालविल्या जातात.

जगण्याला आवश्यक अशा कला, सभोवतालच्या निसर्गाशी संवाद आणि त्याला जोडलेला शाळेचा नेहमीचा अभ्यासक्रम अशी जीवनशाळांची रचना आहे. या शाळांमधून ६ ते ११ वयोगटांतील ७०० विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. मुलांना शिक्षण मिळावे व त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून संस्थेअंतर्गत २८ शिक्षक आणि ३० कर्मचारी कार्यरत आहेत.

निवासी जीवनशाळेची रचना...

आतापर्यंत सुमारे सहा हजार विद्यार्थी जीवनशाळेतून शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत. काही जण पुढे पदवीधर झाले आहेत. यातील बहुतेक जण पहिल्या पिढीतील शिक्षित असून, विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. निवासी स्वरूपात जीवनशाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून, सर्व शाळा २०१४ पासून ‘स्वयं-अर्थ सहाय्य’ तत्त्वावर मान्यता प्राप्त आहेत. संवाद साधण्याच्या दृष्टीने सोयीचे म्हणून शिक्षणाची सुरुवात आदिवासी मुलांच्या मातृभाषेतून होते. नंतर राज्याची भाषा शिकविली जाते आणि पुढे चौथीपर्यंतचे शिक्षण दोन्ही भाषांतूनच दिले जाते. काही शिक्षक (डीएड प्रशिक्षित) असून, आदिवासी समाजातीलच आहेत. जीवनशाळेत मुलांना सकाळी नाश्ता, दोन वेळचे जेवण दिले जाते. याशिवाय मुलांच्या विकासासाठी हस्तकला, चित्रकला, गायन-वादन, नृत्य व विविध खेळ यांचे प्रशिक्षण दिले जाते.

वादळाने जीवनशाळांचे नुकसान...

१३ मे रोजी आलेल्या जोराच्या वादळ-वाऱ्याने नंदुरबार जिल्ह्यात नर्मदेच्या खोऱ्यातील मणिबेली, डनेल व थुवाणी अशा तीन गावांमधील निवासी-जीवनशाळांचे नुकसान झाले आहे. तीन शाळांमध्ये ३६७ मुले शिक्षण घेत आहेत. वादळामुळे शाळांचे छप्पर, पत्रे व कौले उडून गेले. वादळाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पत्रे गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात शेड उभे केले. अशा परिस्थितीत शाळा सुरू करून मुलांना निवासी शाळेत बोलवता येणार नाही. शाळांबरोबरच गावातील लोकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातून शाळांच्या बांधकामासाठी व उभारणीसाठी मदत मिळणे अशक्य आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान संस्थेने शाळांच्या उभारणीसाठी व शाळांच्या पक्क्या बांधकामासाठी समाजाला सोशल मीडियामधून आर्थिक मदतीचे आवाहन केले. आतपर्यंत समाजातून सात लाख रुपयांची मदत जमा होऊन त्यातून एका शाळेची उभारणी पूर्ण झाली आहे. अजून दोन शाळांच्या उभारणीसाठी सामूहिक मदतीची गरज आहे.

२१ संस्थांना मदत

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सोशल फॉर ॲक्शन’ अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांशी निगडित असलेल्या समस्या लोकसहभागाच्या व कंपनी ‘सीएसआर’च्या सहकार्याने दूर करून ग्रामविकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय व्यक्तिगत देणगीदार आणि सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) स्वीकारणाऱ्या आस्थापनांना एकत्र आणून महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी अभियान राबविण्यात येते. गेल्या अडीच वर्षांत सोशल फॉर ॲक्शनमार्फत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या २१ स्वयंसेवी संस्थांचे व चार गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदतीसाठीचे अभियान पूर्ण केले आहे. तसेच, जमा झालेला निधी त्या त्या संस्थांना वर्ग केला आहे.

कशासाठी हवी मदत...

  • शाळा बांधकामासाठी

  • अन्नधान्य

  • मुलांसाठी झोपायची व्यवस्था करणे (स्लिपिंग बॅग्ज)

  • कपाट, रॅक, टेबल व खुर्च्या घेणे

  • धान्य साठविण्यासाठी कोठ्या, कपाटे व लोखंडी पेट्या घेणे

  • शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा साहित्य

अशी करा आर्थिक मदत

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या ‘सोशल फॉर ॲक्शन’ अभियानांतर्गत जीवनशाळांच्या उभारणीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या, औद्योगिक कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ संस्था संचालित ‘निवासी-जीवनशाळा’ उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

किंवा

खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सॲप नंबरवर ट्रान्स्झॅक्शन तपशील पाठवावेत.

Name : Sakal Social Foundation

Account No : ४५९१०४००००२१२५२

Name of Bank :

IDBI bank, Pune.

IFSC Code : IBKL००००४५९

टीम SFA

support@socialforaction.com

अधिक माहितीसाठी संपर्क: ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.