हौस ऑफ बांबू : श्रेयाच्या आट्यापाट्या!

नअस्कार! सर्वप्रथम आमच्या लाखो वाचकांना मकर संक्रांतीच्या एक दिवस बिलेटेड शुभेच्छा. तीळगुळ घ्या, आणि मराठीत गोड बोला! मराठीत गोड बोलणं थोडं अवघड जातं, हे कबूल आहे, पण प्रयत्न केला तर जमून जाईल.
Hous of bamboo
Hous of bamboosakal
Summary

नअस्कार! सर्वप्रथम आमच्या लाखो वाचकांना मकर संक्रांतीच्या एक दिवस बिलेटेड शुभेच्छा. तीळगुळ घ्या, आणि मराठीत गोड बोला! मराठीत गोड बोलणं थोडं अवघड जातं, हे कबूल आहे, पण प्रयत्न केला तर जमून जाईल.

नअस्कार! सर्वप्रथम आमच्या लाखो वाचकांना मकर संक्रांतीच्या एक दिवस बिलेटेड शुभेच्छा. तीळगुळ घ्या, आणि मराठीत गोड बोला! मराठीत गोड बोलणं थोडं अवघड जातं, हे कबूल आहे, पण प्रयत्न केला तर जमून जाईल. कारण मराठी माणसासारखा भाबडा माणूस पृथ्वीतलावर शोधूनसुध्दा सापडणार नाही. कोणीही यावं, आणि मराठी माणसाला गंडवावं. या स्वभावामुळंच मराठी माणसाची भाषा त्याला पारखी झाली. कोणीही येतं, आणि त्याची भाषाच मराठी माणसाच्या गळ्यात बांधून जातं, याला काय अर्थंय?

कुणीही अमराठी सेलेब्रिटी वईट्ट मराठीत दोन तोडकीमोडकी वाक्य बोलला (किंवा बोलली) की आपण खुऽऽश!! टाळ्या वाजवून मोकळे! साक्षात अमिताभ बच्चननं ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे (पुण्यात) म्हटलं तर पुण्यात केवढा उत्सव झाला होता!! पण आता हे बदलायचं हं...सोडायचं नाही.

दुकानाच्या पाट्या मराठीत लावण्याची सक्ती हे त्याचं पहिलं पाऊल आहे. दुसरं पाऊल (मराठी माणसाने तरी) मराठीत बोलण्याच्या सक्तीचं असेल. तिसरं पाऊल (मराठी माणसाने) मराठीत भांडण्याचं असेल. इन धिस ऑर्डर, आपण मराठी भाषेला थेट दिल्लीपर्यंत नेऊ. ज्या दिवशी दिल्लीत ‘कनाट प्लैस’ किंवा ‘चांदनी चौका’त मराठीत पाट्या लागतील, तो खरा सुदिन!! (खुलासा : पुण्यातला चांदणी चौक वेगळा! तिथंही हल्ली ढाबे आणि फर्निचरची दुकानं दिसायला लागली आहेत.)

मध्यंतरी मी तामीळनाडमध्ये गेलेवते, तेव्हा तिथं एकही वळखीची पाटी दिसेना! सगळीकडे नुसती ‘ळळळळळ ळ’!! नुसत्या ळळळच्या वळवळीनं माझा (मराठी) जीव कळवळला. पण याचा अर्थ काय हे विचाळणाळ कोणाळा? कोणीही मराठीत बोळेना की हिंदीत उत्तळ देईना!! सगळं मोकळंढाकळं तमीळ. मला हवी होती साधी टूथपेस्ट, पण तामीळमध्ये टूथपेस्टला काय म्हंटात हेच माहीत नव्हतं. शेवटी एका हिय्या करुन एका दुकानात शिरुन ‘टूथपेस्ट द्या’ हे खुणेनंच सांगितलंन. त्या बिचाऱ्या दुकानदार अण्णाला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं घाबरुन दुकानाचं शटरच ओढायला घेतलंन. शेवटी म्हटलं, ‘टूथपेस्ट’! तेव्हा सुटकेचा निश्वास टाकत तो म्हणाला, ‘‘अय्यो, टूऽऽथपेस्टाऽऽ?’’ जाऊ दे.

यापुढे दुकान कसलंही असो, पाटी मराठीतच असली पाहिजे. इंग्रजी अक्षरं ढब्बाडी आणि कोपऱ्यात मराठी नाव असा चावटपणा चालणार नाही. महाराष्ट्रात असाल तर नावं मराठीतच ठेवली पाहिजेत. बाकी नावं ठेवण्यासाठी मराठीसारखी दुसरी भाषा नाही, हे सगळ्यांनाच हळूहळू समजेल! मराठी पाट्यांमध्ये किती जादू आहे, हे पुण्यात येऊन पाहा म्हणावं! पुणेरी पाट्या हा एक वेगळाच साहित्य प्रकार आहे, असं मला वाटतं.

मराठी पाट्यांचं हे श्रेय कुणाचं? यावर मराठीत लढाई सुरु आहे. खरं तर ही लढाई चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच सुरु झाली होती. पण मराठी माणसाचं कुणी ऐकलं नाही. मग दहा-बारा वर्षांपूर्वी पुन्हा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं काम हाती घेण्यात आलं. तेव्हा काही काचाबिचा फुटल्या. मा. साहेबांच्या (इश्श, मी नाव घेत नाही...) आदेशानं मीदेखील अमराठी दुकानांच्या काचांवर चारसहा दगड भिर्कावून आलेवते. म्हंजे तसं सिंबॉलिकच, लांबून थोडे खडे फेकून मारले एवढंच. खरं तर आमच्या सोसायटीच्या (कोथरुड हं!) दर्शनी भागात ‘हरेक पाटी मराठीच होनी चाहिए...इट इज ए मस्ट’ ही पुणेरी पाटी मी केव्हाच लावून टाकली होती, दुकानाच्या पाट्या मराठीत करण्याची आधुनिक चळवळ माझ्यापास्नंच सुरु झाली, असं म्हणता येईल. मग श्रेय मलाच घ्यायला काय हरकत आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com