
सुनील माने
सयाजी शिंदे हे नाव आपल्याला देशपातळीवर एक कसलेला अभिनेता म्हणून परिचित आहे. पण माझ्या दृष्टीने या मोठ्या अभिनेत्याची चांगली ओळख त्यांचे झाडांवरचे प्रेम, देवराईसाठी सतत झटणे आणि पर्यावरणासाठी काम करणे यासाठी आहे. शिंदे यांनी पर्यावरणासाठी आणि जंगलांसाठी जे उपक्रम राबवले ते केवळ वैविध्यपूर्ण नाही तर पर्यावरणाला उपकारक ठरणारे आहे. त्यांनी १० लाखांहून अधिक झाडे आत्तापर्यंत लावली आहेत, तसेच लोकांना लावायला प्रवृत्त केले आहे. हा एक देशभरात वेगळा उपक्रम ठरेल अशी त्याची योजना होती. ते देशी वृक्षांची लागवड, संगोपन, संरक्षण असे उपक्रम राबवत आहेत.