सारांश : भविष्यकाराची भविष्यवाणी खोटी ठरवणाऱ्या स्मृती इराणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

देशभराचे लक्ष लागलेल्या अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा धक्कादायक पराभव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सर्वांत मोठ्या "जायंट किलर' ठरल्या.

देशभराचे लक्ष लागलेल्या अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा धक्कादायक पराभव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सर्वांत मोठ्या "जायंट किलर' ठरल्या. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाटचालीत त्यांनी चढउतार अनुभवले आहेत. त्यांच्या पदवीवरून विरोधकांनी टीकेचा भडिमार केला होता. ही टीका पचवून त्यांनी काम सुरूच ठेवले होते. स्मृती इराणी या राजकारणात येण्यापूर्वी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. "क्‍योंकि सांस भी कभी बहु थी' या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती.

एकदा स्मृती इराणी लहान असताना मुलीचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी एका भविष्यकाराला घरी बोलावले होते. तेव्हा त्या भविष्यकाराने स्मृतीच्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही, असे सांगितले होते. स्मृती ही काहीच करू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र स्मृती यांनी त्यांना आव्हान देत तुम्ही दहा वर्षांनंतर भेटा, असे सांगितले. तेव्हा स्मृती यांच्या आईवडिलांना ती काय होणार, हे ठाऊकही नव्हते.

यादरम्यान स्मृती इराणी यांनी मुंबई गाठली. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि स्वत:ची ओळख निर्माण झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. स्मृती इराणी या सामान्य कुटुंबातील असून, त्यांचे वडील कुरियर कंपनी चालवतात. 1997 रोजी मिस इंडियाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यांना दोन मुले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smriti Irani won Loksabha Election