

Spirituality is Not Escape: Embracing Life with Mindfulness
Sakal
‘अध्यात्म म्हणजे विरक्ती’ ही आपल्या मनीमानसी अगदी खोलवर रुजलेली समजूत आहे; पण आपल्याला तर भरभरून जगायचं आहे. ‘अध्यात्म म्हणजे विरक्ती’ हेच जर समीकरण असेल तर ते आपल्याला झेपणारं नक्कीच नाही; पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे सद्गुरू तर अगदी स्पष्ट शब्दांत बजावतात, ‘विरक्ती म्हणजे मृत्यू!’