
डॉ. राजीव येरवडेकर
‘सुकदेव साहा विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य व इतर’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भारतभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या भावनिक व मानसिक आरोग्याच्या समस्यांची दखल घेतली आहे. यासंदर्भात महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक तणाव व भावनिक त्रासामुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा ऐतिहासिक निर्णय, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य व्यवस्थांचे पूर्वनियोजित, प्रतिबंधात्मक व प्रतिसादात्मक (उपचारात्मक आणि सहायक) एकत्रीकरण अनिवार्य ठरवतो.