
Technical Education
Sakal
कमलेश पंडे
आपल्या देशातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात गेल्या दशकात लक्षणीय बदल झाले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील ते बदल अभिप्रेत आहेत. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि देणाऱ्या महाविद्यालयांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. त्याबरोबरच हवे त्या गुणवत्तेचे पुरेसे अभियंते मिळत नाहीत असा तक्रारवजा सूर उद्योगक्षेत्राकडून व्यक्त केला जातो. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राचा मेळ आजतागायत हवा तसा साधला गेलेला दिसत नाही.