मद्यपींचा मुक्तिमार्ग

‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’ संस्थेचा पुण्यातील पहिला समूह असलेल्या ‘मदर ग्रुप’चा ४८वा वर्धापन दिन आज ४ जुलै रोजी आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कार्याची माहिती आणि व्यसनातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी एक आवाहन...
मद्यपींचा मुक्तिमार्ग
मद्यपींचा मुक्तिमार्गsakal
Updated on

‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’ संस्थेचा पुण्यातील पहिला समूह असलेल्या ‘मदर ग्रुप’चा ४८वा वर्धापन दिन आज ४ जुलै रोजी आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कार्याची माहिती आणि व्यसनातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी एक आवाहन...

विलास बी.

अ ल्कोहोलिक ॲनॉनिमस (ए.ए.) ही संस्था अतिरेकी मद्यपान करणाऱ्यांना, व्यसनाच्या सापळ्यात अडकलेल्यांना मद्यमुक्त करते आणि तेही मोफत. ही संस्था अमेरिकेत १९३५ मध्ये स्थापन करण्यात आली. मद्याच्या व्यसनात बुडालेल्या दोघांनीच ती स्थापन केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही संस्था आजच्या घडीला १८० देशांत काम करीत आहे आणि अनेक कोटी मद्यपी मद्यमुक्त झाले आहेत. पुण्यात अशीच एक मद्याच्या व्यसनातून मुक्त झालेली व्यक्ती मुंबईहून आली, तेव्हा पुण्यात ए.ए.चा एकही समूह नव्हता. म्हणून त्याने ‘ऑर्नेला हायस्कूल’च्या फादरची परवानगी घेऊन तेथे ए.ए.चा समूह स्थापन करण्याचे ठरविले. पुण्यातील ए.ए.चा पहिला समूह म्हणजेच ‘मदर ग्रुप’ची ४७ वर्षांपूर्वी स्थापना झाली. पुढे सभासद वाढले. म्हणून जे सभासद ज्येष्ठ होते, त्यांना आपल्या भागात समूह स्थापन करण्याची गरज निर्माण झाली.नेहरू स्टेडियम, क्षेत्रीय कार्यालय येथे आंतरगटाचे कार्यालय आहे.

आज पुण्यातील प्रत्येक भागात ए.ए. समूह आहेत. जे २४ तासदेखील मद्यपानाशिवाय राहू शकत नाहीत. अशांना ‘मद्यपाश’ नावाचा आजार होतो. या आजारावर आतापर्यंत कोणतेही औषध,इंजेक्शन निघाले नाही. तसेच, कोणताही गंडा, धागा, ताईतसुद्धा उपयोगी पडत नाही. या आजाराची तुलना मधुमेहाशी केली जाते. कारण दोन्ही कधीही बरे होत नाहीत. पण मधुमेही जसा साखर किंवा गोड पदार्थ खात नाहीत. तसेच मद्यपीला ‘ए.ए.’मध्ये आल्यानंतर मद्यापासून लांब राहता येते.

ए.ए.मध्ये प्रवेशासाठी कोणतीही अट नाही. कोणत्याही धर्माचे, वंशाचे, जातीचे मद्यपी येऊ शकतात. शिक्षण, उत्पन्न, पोस्टसुद्धा विचारली जात नाही. ए.ए.मध्ये संपूर्ण स्वातंत्र्य असते. सभेत कारखानदार, वकील, कलाकार आणि कामगार एकाच बाकड्यावर बसतात. फक्त मद्यपान सोडण्याची इच्छा असली पाहिजे. ए.ए.चा कार्यक्रम फक्त मद्यमुक्त होण्याचा नाही तर तो मद्यपीचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा आहे.

तो आध्यात्मिक आहे. मद्यपान थांबल्यावर तो स्वतःला बदलण्याचा आहे. ‘ए.ए.’च्या सभेत सभासद आपले पिण्याचे अनुभव सांगतात. तसेच मद्यासाठी ते वाटेल ते करण्यास तयार असतात. म्हणजे मित्रांकडून, नातेवाईक यांच्याकडून पैसे घेणे, ते देईनासे झाल्यावर घरात चोरी करणे, भांडी, टीव्ही, फ्रीज, कपाटे अगदी चांदीचे देवसुद्धा विकतात. तसेच ए.ए.मध्ये बहुतेक जण सर्व काही घालवून बसलेले असतात. त्याला ‘तळ गाठणे’ असे म्हणतात. पण मद्यमुक्तीनंतर मद्यपीची भरभराट होऊ लागते. त्यासाठी कष्ट मात्र करावे लागतात, मग दुरावलेले कुटुंबीय पुन्हा येतात.

अनेकजण म्हणतात की, मद्यपान असे थोडेच थांबते? पण या सगळ्या दुष्टचक्राचा अनुभव घेतलेले सभासद अतिमद्यपानाच्या स्वानुभवाविषयी, त्यातून आपण कसे बाहेर पडलो, हे जेव्हा सांगतात, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ज्यांना मद्यपान थांबविण्याची इच्छा आहे, त्यांनी चार जुलैला संध्याकाळी सात वाजता ऑर्नेला हायस्कूल येथे सभेला जरूर यावे.

अधिक माहितीसाठी

पुणे फोन नंबर ०२०-२४४६८०८७,

पिंपरी-चिंचवड ७२१८९७६७४,

मो. ९६०४२९९४६७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.