नअस्कार! पुण्यात गेलं की पुणेकर व्हावं अशी जुनी म्हण आहे. प्राचीन काळी पुण्यात येऊन गेलेल्या एका प्राचीन रोमन प्रवाश्यानं ‘व्हेन इन रोम, बिहेव लाइक ए रोमन’ असं रुपांतर करुन प्रचलित केलं. या मुहावऱ्याचं मूळ जुन्या पुण्यात आहे, असं माझं संशोधन आहे. सदरील रोमन प्रवाशी ज्या काळी जगभर हिंडत होता तेव्हा तिथं अभिवाचनाची प्रथा होती.