

आईपलीकडची ‘ती’: अरुंधती रॉय यांच्या आत्मचरित्रातून उलगडलेले मेरी रॉय यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व; आईकडे ‘व्यक्ती’ म्हणून पाहण्याची नवी दृष्टी
Sakal
अॅड. अभिधा निफाडे
केरळमधल्या मिसेस रॉय यांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांची स्वतःची मुले शिकत असताना त्यांनी आपल्या आईला ‘आई’ न म्हणता इतर विद्यार्थ्यांसारखं ‘मिसेस रॉय’च म्हणायचं, असा दंडक होता.हा प्रसंग सध्या चर्चेत असलेल्या अरुंधती रॉय यांच्या ‘मदर मेरी कम्स टू मी’ या आत्मचरित्रातील आहे. ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ या पुस्तकासाठी प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्काराने सन्मानित अरुंधती रॉय या वैयक्तिक अनुभवांमधून व्यापक सामाजिक वास्तव मांडणाऱ्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. या पुस्तकात त्या आपल्या आईकडे म्हणजे ‘मेरी रॉय’ यांच्याकडे ‘आई’ नात्यापलीकडे जाऊन नव्या नजरेने पाहतात.