.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
हौस ऑफ बांबू कु. सरोज चंदनवाले
न अस्कार! हल्ली रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. चिंतेनं मन अगदी काळवंडून गेलं आहे. मन काळवंडलं की त्वचाही काळवंडते, असं मी कुठे तरी वाचलं होतं. मला टेन्शनच आलंय. कोण होणार आगामी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष? सगळं काही ठीक होईल ना? मधल्या काळात निवडणुका होऊन जातायत, त्यानंतर नव्या सरकारचं मराठीबाबतचं धोरण बदलेल का? असे कितीतरी प्रश्नांचे भुंगे माझ्या मनात गुं गुं करत आहेत. भुंगेच ते!!