मागोवा : शांततेऐवजी पुन्हा संघर्षाच्या ‘सामुद्रधुनी’त

अमेरिका-इराण चर्चेचा २१ तासांचा मॅरेथॉन संवाद अखेर फिस्कटला; अविश्वास, अणुकार्यक्रमावरील मतभेद आणि होर्मूझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे पश्‍चिम आशियात पुन्हा संघर्षाचे ढग दाटले
"चर्चा केवळ देखावा, युद्ध हाच हेतू?" अमेरिका-इराणमधील मौनाचे अर्थ उलगडताना जग पुन्हा चिंतेत.

"चर्चा केवळ देखावा, युद्ध हाच हेतू?" अमेरिका-इराणमधील मौनाचे अर्थ उलगडताना जग पुन्हा चिंतेत.

Sakal

Updated on

गणाधीश प्रभुदेसाई

‘विश्‍वास असेल तर मौनातलंही कळतं. विश्‍वास नसेल तर शब्दांनीही गैरसमज होतात. विश्‍वास हा दोघांमधील संबंधांचा आत्मा असतो’, अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. पाकिस्तानातील अमेरिका-इराण दरम्यानच्या चर्चेबाबत बोलताना वरील म्हण तंतोतंत लागू पडते. तब्बल २१ तासांच्या चर्चेनंतर अमेरिका व इराण यांच्यातील बोलणी फिसकटल्याची बातमी आली आणि या चर्चेकडे डोळे लावून बसलेलं जग पुन्हा चिंतेच्या व अनिश्चिततेच्या सावटाखाली आले. युद्धविराम झाल्यामुळे जीव भांड्यात पडल्याचा आनंद काही तासच टिकला. कोणत्याही चर्चेचे यश हे दोन्ही बाजूकडील ‘गांभीर्य’ आणि ‘हेतू’ यावर अवलंबून असते. अमेरिका आणि इराणदरम्यान या दोन गोष्टींचाच अभाव जाणवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com