व्यक्तिनामा : ‘भरारी’ घेणारा उद्योजक

‘द कंप्लिट मॅन’ची संकल्पना घडवून वस्त्रउद्योगात क्रांती घडवणाऱ्या, विक्रमशील हवाई साहसांनी नावाजलेल्या आणि उत्तरार्धात कौटुंबिक संघर्षांना सामोऱ्या गेलेल्या उद्योगपतीचे व्यक्तिचित्रण
The Legacy of Raymond: How Vijaypat Singhania Built an Iconic Global Brand

The Legacy of Raymond: How Vijaypat Singhania Built an Iconic Global Brand

Sakal

Updated on

अरविंद रेणापूरकर

‘द कंप्लिट मॅन’ लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरातील ‘द रेमंड शाॅप’मध्ये जाण्याचे स्वप्न सर्वच जण बाळगतात. रेमंडचे वस्त्र परिधान करणारी व्यक्ती रुबाबदार, देखणी आणि प्रतिष्ठित असते, अशी भावना समाजमनावर रुजलेली असून, यामागे उद्याेगपती विजयपत सिंघानिया नावाच्या उद्याेजकाची दूरदृष्टी लपलेली आहे. रेमंड हे नवाेन्मेष आणि ब्रँडिंगच्या ताकदीचे प्रतीक मानले जाते. रेमंड समूहाला जागतिक स्तरावर पाेचवताना त्यांनी केवळ एक कंपनी उभारली नाही, तर अभिजन वर्गाची एक सांस्कृतिक प्रतिमा घडवली. त्यांच्या आयुष्याचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच ताे शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक संघर्षांनी व्यापला आहे. एअर कमाेडाेर विजयपत सिंघानिया यांच्या निधनामुळे भारतीय उद्याेगविश्वाची माेठी हानी झाली आहे. त्यांचे जाणे हे केवळ एका उद्याेगपतीचे निधन नाही, तर एका अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याचा शेवट आहे, ज्यांनी भारतीय पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाला नवे वलय मिळवून दिले. ज्या साम्राज्यवादी इंग्रजांनी भारतीय नागरिकांना तुच्छ लेखले, आज त्याच देशातील कंपनी ५५ हून अधिक देशांना भारतीय उद्याेगपतीने साकारलेले उंचीचे वस्त्र निर्यात करत आहे.  रेमंड समूहाची कथा एका छाेट्या ‘वुलन मिल’पासून सुरू झाली. १९२५ मध्ये ठाण्यात सुरू झालेली ही मिल पुढे सिंघानिया कुटुंबाने १९४४ मध्ये विकत घेतली. कैलासपत सिंघानिया यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने प्रगतीची कास धरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com