सब्र का फल (परिमळ)

विश्‍वास सहस्रबुद्धे
बुधवार, 21 डिसेंबर 2016

‘सब्र का फल मीठा होता है’ हे वचन आपणा सर्वांना चांगलेच परिचित आहे. सब्र म्हणजे धीर. पेशन्स, एन्ड्यूअरन्स. आपण एखाद्याला नेहमी म्हणतो, ‘अरे धीर धर, एवढी घाई काय आहे?’ सब्रसाठी मराठीत फार छान शब्द आहे- तितिक्षा! पण तितिक्षा म्हणजे केवळ ‘घाई न करणे’ नव्हे. कृतीचे दोन प्रकार असतात. क्रिया आणि प्रतिक्रिया. बाह्यघटनेला आपण दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. प्रतिक्रिया अनेकदा प्रतिक्षिप्त असते. उदाहरणार्थ, चटका लागला की झटकन बाजूला होणे. ही क्रिया अक्षरशः क्षणार्धात घडते. आपले तिच्यावर नियंत्रण नसते; पण अनेक स्वाभाविक प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवता येते.

‘सब्र का फल मीठा होता है’ हे वचन आपणा सर्वांना चांगलेच परिचित आहे. सब्र म्हणजे धीर. पेशन्स, एन्ड्यूअरन्स. आपण एखाद्याला नेहमी म्हणतो, ‘अरे धीर धर, एवढी घाई काय आहे?’ सब्रसाठी मराठीत फार छान शब्द आहे- तितिक्षा! पण तितिक्षा म्हणजे केवळ ‘घाई न करणे’ नव्हे. कृतीचे दोन प्रकार असतात. क्रिया आणि प्रतिक्रिया. बाह्यघटनेला आपण दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. प्रतिक्रिया अनेकदा प्रतिक्षिप्त असते. उदाहरणार्थ, चटका लागला की झटकन बाजूला होणे. ही क्रिया अक्षरशः क्षणार्धात घडते. आपले तिच्यावर नियंत्रण नसते; पण अनेक स्वाभाविक प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवता येते. हे नियंत्रण ज्या गुणामुळे शक्‍य होते, त्यालाच सब्र किंवा तितिक्षा म्हणता येते. काम, क्रोध, लोभ आदी विकारांवर मात करण्यासाठी तितिक्षा हा गुण फार उपयुक्त आहे. आपण सारेच केव्हा ना केव्हा विकारांना बळी पडलेलो असतो; पण कधी कधी आपण जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक (किंवा नाईलाजाने) त्यावर मातही केलेली असते. आपल्या खात्यात दोन्ही प्रकारचे क्षण असतात. ते क्षण आठवून बघा आणि तुलना करा. दोहोंमध्ये एकाच गोष्टीचा फरक असेल. तितिक्षा! तितिक्षेच्या मुळाशी विचार असतो असे म्हणता येते. कृती करण्याआधी जणू आपण मनातल्या मनात एक ते दहा आकडे मोजतो आणि मग कृती करतो. 

तितिक्षा हा गुण बहुतांश वेळा उपयुक्त शाबित झालेला आहे. त्यामुळे परिस्थितीचे आकलन करण्यास अवधी मिळतो. बहुतांश वेळा असे म्हटले, कारण अनेकदा परिस्थितीच अशी असते, की विचार करायला किंवा वाट बघायला तेवढा अवधी मिळतोच असे नाही. अशा वेळी निर्णय घेऊन टाकणे क्रमप्राप्त असते. अशा प्रसंगी आपण अंतःप्रेरणेने निर्णय घेतो. अनेकदा इच्छा आणि सवड असली, तरी आपण तितिक्षेचा वापर करत नाही. उदाहरणार्थ, अंधारात वेटोळे दिसले तर आपण तत्काळ त्याच्यापासून दूर होतो. ‘ती दोरीच कशावरून नसेल?’ म्हणून त्यावर पाय ठेवत नाही. अशा ‘खोट्या इशाऱ्यां’ची- फॉल्स कॉल- आपण दखल घेतो. कारण तो इशारा भलेही खोटा असला तरी काही बिघडत नाही; पण न जाणो खरा असला तर जीवच जाऊ शकतो. विषाची परीक्षा न घेणेच इष्ट नव्हे काय?

मात्र, तितिक्षा म्हणजे दीर्घसूत्रीपणा- बोलीभाषेत- चेंगटपणा नव्हे. लोखंड गरम होईपर्यंत धीर धरणे म्हणजे तितिक्षा; पण जोवर ते गरम आहे, तोवरच घाव घालायला हवा. खरे म्हणजे हा विचार कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणा गुरूची गरज नाही. तितिक्षा ही एक पाशवी अंत:प्रेरणा (ब्रूट इंस्टिन्क्‍ट) आहे. निसर्गाने आपणा सर्वांना तितिक्षेचे वरदान दिले आहे; पण आम्हाला सगळे कसे ‘आत्ताच’ हवे असते, त्याला निसर्ग तरी काय करणार?

Web Title: vishwas sahasrabudhe article