
Kashmir Agenda : पहलगाममधील नृशंस घटना याच वेळी आणि २२ एप्रिल याच दिवशी का घडवली गेली हे कुणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. तथापि, आपण अभ्यासपूर्ण विश्लेषणातून काही बिंदू निश्चितच जोडू शकतो. या ‘जिगसॉ’ कोड्याच्या तुकड्यांमधील एक तुकडा म्हणजे जनरल असीम मुनीर यांचे १६ एप्रिलचे भाषण. यात द्विराष्ट्र सिद्धांत आणि इस्लामिक इतिहास यासोबतच महत्त्वाचा घटक म्हणजे काश्मीरचा संदर्भ. ‘ही मुख्य नस असून, हे आम्हाला विसरता येणार नाही’ असा दावा त्यांनी भाषणात केला होता.