हौस ऑफ बांबू : आण्टी कुणा म्हणावे..?

‘आंटी’ या संबोधनातून स्त्रीच्या वय, रूप आणि ओळखीवर होणाऱ्या चहाटळ टिप्पणींवर उपरोधिक भाष्य; तरुण-मध्यमवयीन स्त्रियांच्या न बोलल्या जाणाऱ्या वेदनेला शब्द देणारा हौस ऑफ बांबूचा खुसखुशीत लेख
"चाफेकळीस आता झेंडू म्हणू नका रे!" 'आंटी' संबोधनामुळे पुण्यात पेटली नवी ठिणगी; आदर की अपमान?

"चाफेकळीस आता झेंडू म्हणू नका रे!" 'आंटी' संबोधनामुळे पुण्यात पेटली नवी ठिणगी; आदर की अपमान?

Sakal

Updated on

कु. सरोज चंदनवाले

नमस्कार! एका वेगळ्याच तरल विषयावर आज मी चिंतन करतेय. चिंतन करणं हा माझा स्वभावच आहे. संधी मिळेल तेव्हा मी चिंतन करत्ये. यावेळी अचानक मला चिंतनासाठी वेगळाच विषय मिळाला. मिळाला कसला? अगदी हातात गावला! गेली कित्येक वर्षं किंवा महिने मी बघत्येय, पुण्यातले अत्यंत चहाटळ लोक मला ‘आण्टी’ अशी हांक मारू लागले आहेत. परवा कोथरूडहून मी कुठं तरी निघाल्ये होते, तेव्हा रिक्षावाल्याने मला चक्क ‘आंटी छुट्टा देना’ असं हिंदीत सांगितलं. उर्मट मेला! एक तर पुण्यात माझ्याशी हिंदीत बोलला, वर मेला आंटी म्हणाला. तळपायाची आग मस्तकाला गेली. राजसाहेब ठाकऱ्यांना तुझ्या रिक्षाचा नंबर देईन असा दम मारल्यावर मराठीत म्हणतो कसा? -‘‘बरं आंटी, माझा चुकला!’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com