

Being Alcaraz: The Inspiring Story of Tennis’s Youngest World No. 1
Sakal
आ. श्री. केतकर
कार्लोस अल्काराझ हा सध्याचा आघाडीचा टेनिसपटू आहे. आजवर त्याने ‘ग्रँड प्री’ स्पर्धा मालिकेतील एकूण सात विजेतिपदे मिळवली आहेत. तो बावीस वर्षांचा आहे आणि या वयात कोणत्याही टेनिसपटूला अगदी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांनाही असे यश मिळाले नव्हते. त्याचेच चरित्र आता ‘बीइंग अल्काराझ ः द मॅन बिहाइंड स्माइल’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. लेखक आहे मार्क हॉजकिन्सन. ते फोटोग्राफरही आहेत. अल्काराझच्या जीवनाबाबत त्यांनी लिहिले आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या कारकिर्दीबाबतही. त्यामुळेच हे पुस्तक मोलाचे आहे.