
सुलभा तेरणीकर - saptrang@esakal.com
तीसचं दशक. भारताच्या चित्रनिर्मितीचे दशक पाहू जाता अनेक रहस्यांची, कथांची मालिका समोर येते. इंग्रजांचे ‘फोडा झोडा’चे राजकारण कितीही क्रूर असो, सिनेमाच्या भाषिक सूत्रांनी ते निष्प्रभ होत असे. त्या वेळच्या अखंड भारतातल्या लाहोरमध्ये, मुंबईमध्ये कितीतरी कथांचे अंकुर फुटत होते. दुर्गा खोटे, लीला चिटणीस, शोभना समर्थ या नवतरुणी होत्या, तर बेबी मीना, बेबीरानी, मीनाकुमारी, नर्गिस म्हणून येण्याच्या प्रतीक्षेत होत्या...