गेल्या पंचवीस वर्षांत अनेक घटना घडल्या. जागतिक पटलावर ‘९/११’चा दहशतवादी हल्ला, सन २००८ चा फायनान्शिअल क्रायसिस, त्यानंतरचा ‘अरब स्प्रिंग’, वाढत्या विषमतेविरुद्ध ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ची चळवळ, डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडून येणे आणि जगभर डीग्लोबलायझेशन सुरू होणे, कोविड पॅँडेमिकने जग हादरून जाणे, युक्रेनचे युद्ध, इस्राईलचा पॅलेस्टाईनवर निर्घृण हल्ला, ट्रम्प यांचे पुन्हा निवडून येणे...