
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
एक पुस्तक शोधत असताना काहीतरी पडल्याचा आवाज आला. पाहते तर एक छोटी पाॅकेट डायरी होती. मी काॅलेजमध्ये असतानाच भरली होती. मग इतकी का जपून ठेवली होती? असं काय होतं यात? तर कबीरजींचे दोहे. त्या वेळी वेगवेगळ्या लहान लहान वह्यांमधून काय काय उतरवून काढायचा नादच लागला होता. तशी ही एक दोह्यांची वही होती. दोन-दोन ओळींचा एक दोहा; पण केवढा मोठा विचार आणि किती रंजकता! ती एवढीशी वही पहाण्यात किती वेळ निघून गेला असता.