- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com
कवी भास्कर रामचंद्र तांबे अर्थातच भा. रा. तांबे हे ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी म्हणून ओळखले जातात. त्या वेळच्या म्हणजे केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी, ना. वा. टिळक, गोविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींच्या कवी आणि कवितांमध्ये अग्रेसरत्वाचा मान भा. रा. तांबे यांच्याकडे जातो. त्यांच्या कविता प्रामुख्याने जीवनात अनुभवलेल्या सुखदु:खांवर आधारलेल्या आहेत.