
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
गुरेजमध्ये तर गोष्टींची पुस्तकेच नाही आहेत! इथे सगळीकडे फक्त बर्फच बर्फ आहे! गुरेज. आमियाचं गाव. काश्मीरमधील सीमाभागात असलेलं. एके दिवशी आमियाच्या शाळेत दूरवरून एक काका आले होते. त्यांच्या हातात होतं एक सुंदर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक. बुखारी (बुखारी म्हणजे काश्मीरमध्ये थंडीच्या दिवसात घरातलं वातावरण उबदार ठेवण्याकरता पेटवतात.) भोवती बसलेल्या आमिया आणि तिच्या मैत्रिणी उत्सुकतेने, डोळे विस्फारून ते रंगबेरंगी पुस्तक बघत होत्या. ते पुस्तक म्हणजे आमियाच्या शाळेत सुरू होणाऱ्या नवीन किताबखान्यातलं पहिलं पुस्तक असणार होतं. किताबखाना? ते काय असतं?