
ऋचा थत्ते rucha19feb@gmail.com
२०२४ आता जुनंही वाटू लागलं असेल ना. बघता बघता आज १२ तारीख आली. उद्यापासून १३ करू दिन गिनगिनके... मग महिना संपेल आणि अशीच कॅलेंडरची पानं उलटत राहतील; पण खरं सांगू, कॅलेंडरची पानं नुसतीच उलटतात असं नाही वाटत मला. माझं तर फार खास नातं आहे कॅलेंडरशी. अर्थात अनेकांचं तसं असूच शकतं.