
Diwali Festival
esakal
जो तो दुसऱ्याकडे बोट करतानाच भेटला दिवाळीला. पण अजूनही सगळे पाय रोवून उभे होतेच की. जसे एका दिवशी तेरा सिनेमे... शेकडो दिवाळी अंक... कपड्यांची जंगी दुकानं... मिठायांच्या थप्प्या... कोणालाही आधीच पुरतं नाराज करण्याचा सणाचा स्वभाव नव्हता. उलट वेगवेगळ्या कल्पना लढवायला वाव देत होते ते. याचाच अंमळ विचार करता करता दिवाळी पुढे सरकली.
*आपल्या स्वागतासाठी लोक वर्षानुवर्षं एवढे सजतात, धजतात, आतषबाजी करतात... हॉटेलं झिजवतात... वजनं आणि ई.एम.आय. वाढवून बसतात... त्यामानाने आपण त्यांच्यासाठी खास काहीच करत नाही हे जाणवलं, तेव्हा दिवाळीला डिप्रेशन आलं. आपण नुसतं कागदी आकाशकंदिलात, अंगणातल्या किल्ल्यात, फराळाच्या डब्यांमध्ये अडकून राहतोय त्या ठिकाणी. हे बरं नाही. लोकांना भेटायला हवं, संवाद साधायला हवा, कुठे तरी मॉडर्न टच यायला हवा. दिवाळीने यावर ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि ती नटूनथटून रस्त्यावर उतरली.