दुनियादारी : तेरे नैना, तेरे नैना रे!

‘मी सिरियसली विचारतीये. तुला बोअर होत असेल किंवा कंटाळा आला असेल, तर काही इश्‍यू नाही. तुला जायचं तर जाऊ शकतोस...’ ती म्हणाली.
दुनियादारी : तेरे नैना, तेरे नैना रे!
Summary

‘मी सिरियसली विचारतीये. तुला बोअर होत असेल किंवा कंटाळा आला असेल, तर काही इश्‍यू नाही. तुला जायचं तर जाऊ शकतोस...’ ती म्हणाली.

‘तुला झोप येतीये का?’

मेघनानं अरविंदच्या कानापाशी जाऊन एकदम दबक्या आवाजात विचारलं.

‘येत असली, तरी तू तुझा खांदा देणारेस का मला डोकं ठेवायला... नाही ना?’ डोळे उघडे ठेवण्याच्या प्रयत्नात अरविंद म्हणाला.

मेघनानं त्याला सटकन पण हळूच एक हातावर चापट मारली.

‘मी सिरियसली विचारतीये. तुला बोअर होत असेल किंवा कंटाळा आला असेल, तर काही इश्‍यू नाही. तुला जायचं तर जाऊ शकतोस...’ ती म्हणाली.

‘असं काही नाहीये... इतकं शास्त्रीय संगीत सलग तासन् तास कानावर पडायची सवय नाहीये मला, म्हणून डोळे जड होतायेत. पण तेवढं चालतं.’

‘नक्की ना? शास्त्रीय संगीताचं कारण तू देतोयेस ते ठीक आहे, पण शास्त्रीय नृत्य सगळ्यांच्या बघण्याची कला नाहीये हे मी समजू शकते. उगाच लोड नको घेऊस.’

‘लोड काय त्यात? उशी पण नाही घेते मी. मी एन्जॉय करतोय, तू त्याची काळजी करू नकोस.’

‘हां..’’\

ते दोघं तात्पुरते शांत झाले आणि पुढील कार्यक्रम बघत राहिले. अरविंदची पूर्णवेळ काहीबाही चुळबुळ सुरू होती. कधी पाणी पी,

कधी इकडे बघ, कधी अंधारातून जमेल तसे मेघनाकडे बघ. पण तो तितक्याच आत्मीयतेनं समोर होणारा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम पण बघत होता. कार्यक्रम संपला, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अनौपचारिक गप्पा वगैरे झाल्यावर ते दोघं बाहेर पडले.

‘तुला एक विचारू?’

‘बोल की अगं! असली फॉर्मल काय बोलतीयेस?’

‘अरे तसं नाही, तू खरं खरं उत्तर देणार असशील तरच विचारते... म्हणून.’

‘विचार गं बिंदास!’

‘मला खरं खरं सांग, तुला प्रचंड बोअर झाला ना आजचा शो?’

‘नाही गं बाई, मग मी तीन तास बसलो असतो का?’

‘पण तू इंटरेस्ट नसताना आलास... बरोबर?’

अरविंदनं मान थोडी मागं केली आणि मग एक भुवई वर.

‘मला सांग, तू कधी तुझ्या लहान बहीण भावांसोबत किंवा सोसायटीतल्या मुलांसोबत ते दिवाळीत कसा किल्ला करत बसलेत हे खूप वेळ बघत बसली आहेस?’ त्यानं विचारलं.

‘त्याचं काय आत्ता? मी काय विचारतीये... तू काय विषय कढतोयस?’

‘अगं सांग ना, कधी तुझ्या आजी-आजोबांना त्यांचे जुने मोजके फोटो असलेले अल्बम घेऊन बसलेलं बघितलंय?’

‘प्च! हो बघितलंय ना! आणि नुसतं बघितलं नाहीये त्यांच्यासोबत बसून ते सगळं बघितलं सुद्धा आहे!’

‘तेव्हा आपल्याला ते जे फोटोत नातेवाईक दाखवत आहेत ते माहीतही नसतात, आपण ओळखताही नसतो त्यांना आणि बहुतेकवेळी आपल्याला काहीही इंटरेस्टही नसतो त्यांना बघण्यात. तसेच लहान मुलांच्या किल्ला करण्यात आपल्याला इंटरेस्ट आता काय तसा राहिला नसतो... तरीही आपण ते आपुलकीने बघतोच ना? का सांग बरं?’

मेघना तोंड वाकडं करते आणि कपाळावर आठ्या घेऊन म्हणते, ‘का काय? त्यांच्यासाठी ते किती महत्त्वाचं असतं! त्यांच्या डोळ्यात दिसत असतं ते सुख. त्यांच्या मनातल्या सगळ्या सुंदर भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. मग ते आपले फोटो आवर्जून दाखवणारे आजोबा असतील किंवा किल्ला करणारी पोरं...’

‘एक्झॅक्टली!" अरविंद उद्गारतो. ‘मला असं बोअर वगैरे आज काहीच नाही झालं कारण मी पण नृत्य जे स्टेजवर सुरू होतं त्या पेक्षा तू ते बघताना तुझ्या डोळ्यात दिसणारं नृत्यावरचं प्रेम जास्त एन्जॉय करत होतो!’

मेघना त्याच्याकडं एकटक बघते आणि तिच्या आठ्या कधी छान स्माईल मध्ये कन्व्हर्ट होतात तिलाच कळत नाही.

‘कुठून आणतो रे इतके फिल्मी डायलॉग?’

‘तुला वाटलं झोपतोय मी पण मध्ये-मध्ये डोळे बंद करून हेच डायलॉग तयार करत होतो मगाशी!’

तो म्हणतो. ते दोघंही हसतात.

ऐसे नैनों की बातों में कोई क्यूँ न आये?

होsss तेरे नैना, तेरे नैना, तेरे नैना रे!

mahajanadi333@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com