दुनियादारी : किती बोलले, किती ‘भोगले’? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुनियादारी : किती बोलले, किती ‘भोगले’?

‘अरे बास बास! तू शाळेतल्या मुलांच्या सवयी सांगता सांगता पार मेघालयातल्या गुफांमध्ये पोचलास!’ जोरात हसत नमिता क्षितिजला म्हणाली.

दुनियादारी : किती बोलले, किती ‘भोगले’?

‘अरे बास बास! तू शाळेतल्या मुलांच्या सवयी सांगता सांगता पार मेघालयातल्या गुफांमध्ये पोचलास!’ जोरात हसत नमिता क्षितिजला म्हणाली.

प्रचंड आणि कुठल्याही विषयावर गप्पा मारायचे हक्काचे ठिकाण असलेल्या ह्या दोघांची संध्याकाळची भेट आज बहुधा नवीन गंमतशीर वळण घेत असताना दिसत होती.

स्वतःचं भरकटणं जाणवल्यानं क्षितिजपण बोलता बोलता थांबतो आणि हलका लाजून गालातल्या गालात लाजतो. ‘अगं, मी नुसतं एक एक्झॅंपल देत होतो, विषय तोचे!’ तो म्हणतो.

नमिता तशीच हसत असताना म्हणते, ‘‘इतरांना मुद्यावरून भरकटत असतात म्हणून इतकं बोलतोस, तू स्वतः काही वेगळा नाहियेस.’’

‘बासच हां आता! उगाच मला चिडवायचं म्हणून काहीतरी बोलू नकोस तू...’

‘तसंच पण तुझं...’’ नमिता हसत असताना डोळे मोठे करून म्हणते,’...तू कुठलीच गोष्ट सांगताना असं साधं २-३ वाक्यात संपवून टाकत नाहीस. सगळं अगदी वर्णनात्मक असतं बघ तुझं. हातवारे करून, सिनेमांचे रेफ्रन्स देत आणि मीठ मसाला टाकतच तुला सगळं सांगायचं असतं!’’

‘एक्सक्युझ मी!! त्याला कॉन्व्हरसेनश इंटरेस्टिंग करणं, लिसनेबल करणं म्हणतात!’ क्षितिज हलका ऑफेंड होऊन म्हणाला.

‘असलं कोणीही काहीही म्हणत नाही ह्याला... ह्याला फक्त ‘वाढवून चढवून बोलणं,’ असं म्हणतात. आणि तू एक्झॅक्टली तेच करतोस...’ नमिता तोंडावर हात ठेऊन म्हणाली.

क्षितिजनं डोळे बारीक करून तिला नुसता एक लुक दिला.

‘हे तुम्ही क्रिकेट न बघणाऱ्या लोकांना ना काही कळत नाही रंजक काँवरसेशन म्हणजे काय चीझ असते ते!’ तो म्हणाला.

‘हां?? त्याचा काय इथं संबंध??’

‘आहे बरंका! तुम्हाला माहीतच नाही की कसं रटाळ टेस्ट मॅचला किंवा पावसामुळं थांबलेल्या मॅचमध्ये सुद्धा हर्षा भोगले त्याच्या नुसत्या गप्पांनी आणि रंजकपणे विषयाला खेचण्यानं केवढा इम्पॅक्ट करतो, केवढी गंमत आणतो. हंहं... ते ऐकून घेण्याचा जमानाच गेला ह्या तीस सेकंदात विषय संपवणाऱ्या सोशल मीडिया व्हिडिओजच्या भडीमारात.’ क्षितिज उपहासात्मक पण तरी मिस्कील पद्धतीने बोलला.

‘बापरे! तुम्ही स्वतःला लोकल हर्षा भोगले समजता की काय...??’ नमितानं क्षितिजच्या मुद्द्याकडं दुर्लक्ष करून तिचं त्याला चिडवणं सुरू ठेवलं.

‘...आणि बघ तू पुन्हा कुठल्या मुद्द्यावरून कुठे आलास ते! हेच म्हणतीये मी!’ असं म्हणत ती पुन्हा तोंडावर हात ठेऊन हसायला लागली. क्षितिजनं नुसतं खोटं खोटं तोंड वाकडं केलं.

‘तू ना सेम माझ्या बाबांसारखा वागतोस माहिती का... त्यांना पण अशाच गप्पा मारायला आवडायच्या, सगळ्यात काहीतरी वाढवून चढवून बोलायचं आणि क्रिकेट विषय असेल तर झालंच! मे बी, तुम्ही दोघंही खूप क्रिकेट बघून आणि हर्षा भोगलेची कॉमेंटरी ऐकून असे झाला असणार...’ नमिता म्हणाली.

‘ह्याला चांगली क्वालिटी म्हणून पण बघता येऊ शकतं!’

‘उगाच सारवासारव करू नको... 'Exaggeration' असा शब्द आहे तुमच्या ह्या बोलण्याच्या पद्धतीला. शिकवला आहे का तुमच्या हर्षा भोगलेनं तुम्हाला?’

त्यांची चर्चा पुढं भरपूर रंगली. एका विषयातून दुसऱ्या विषयात प्रवास करत करत त्यांनी एकमेकांचा त्या संध्याकाळी करिता निरोप घेतला.

मध्यरात्री, अगदी झोपायच्यावेळी अचानक नमिताचा क्षितिजला मेसेज आला. त्या मेसेजमध्ये हर्षा भोगलेच्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओची लिंक होती ज्यात तो आयुष्य आणि रिलेशनशिप्सवर वगैरे बोलला होता.

‘हा हर्षा भोगलेचा इंटरव्ह्यू पाहिला आहेस का? मस्तय खूपच!’ तिनं त्याला विचारलं.

अंधारात फोनचा लाइट चेहऱ्यावर पडत असताना क्षितिजनं तो मेसेज वाचला. त्यावर त्यानं पहिले फक्त एक स्माईल करणारा ईमोजी टाकला.

‘काय गं... तुझ्या बाबांना मिस करतीयेस का?’

‘हो...’

तिनं पाच एक सेकंद तो मेसेज वाचून आणि डोळ्याच्या काठांवर आलेलं पाणी गालावर ओघळू देऊन मग हा रिप्लाय दिला.

Exaggerate नाही करते, पण ह्याहून सुंदर पाच सेकंदांची शांतता त्या दोघांनीही आत्तापर्यंत अनुभवली नव्हती.

mahajanadi333@gmail.com

Web Title: Aaditya Mahajan Writes Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang