चारचाकी वाहनांना सुरक्षेची कवचकुंडले लाभत असताना आता दुचाकी वाहनेदेखील तितक्याच क्षमतेने सुरक्षित होत आहेत. यात एबीएस प्रणालीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. काळानुसार जुनी ब्रेक सिस्टिम कालबाह्य ठरत असून ती हानी टाळण्यास अपयशी ठरत आहे.
म्हणून एबीएसचे महत्व ओळखून केंद्र सरकारने येत्या जानेवारी २०२६ पासून वाहन कंपन्यांना ‘एबीएस’ युक्त दुचाकी वाहनांची निर्मिती करण्याचे बंधन घातले आहे. पण अत्यंत कमी सीसीच्या आणि कमी वेग असणाऱ्या दुचाकी वाहनांना वगळले आहे.