इंटरनेट ऑफ थिंग्ज (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail .com
रविवार, 24 मार्च 2019

कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला जोडलेली जातात, ती स्मार्ट असावी लागतात. आयओटीमध्ये उपकरणांना सूचना किंवा आज्ञा आपण आपल्या मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून दूरवरूनही देऊ शकतो. या सूचना मग त्या उपकरणाच्या मेमरीत साठवल्या जातात आणि मग तिथल्या एम्बेडेड सिस्टिमप्रमाणे त्या सूचना किंवा आज्ञा यांचं पालन होतं.

कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला जोडलेली जातात, ती स्मार्ट असावी लागतात. आयओटीमध्ये उपकरणांना सूचना किंवा आज्ञा आपण आपल्या मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून दूरवरूनही देऊ शकतो. या सूचना मग त्या उपकरणाच्या मेमरीत साठवल्या जातात आणि मग तिथल्या एम्बेडेड सिस्टिमप्रमाणे त्या सूचना किंवा आज्ञा यांचं पालन होतं.

"इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT-आयओटी)' हा एक भन्नाटच प्रकार आहे; पण आयओटी म्हणजे नेमकं आहे तरी काय? कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. म्हणूनच इंटरनेटला "नेटवर्क ऑफ नेटवर्क्‍स' असं म्हणतात. आता आयओटीमध्ये या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. यामध्ये टीव्ही, फ्रीज, एसी, सीसीटीव्ही, पंखे, दिवे, डोअर बेल, म्युझिक सिस्टिम, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन, ड्रायर, मोबाईल फोन, पाण्याचा पंप, स्वयंपाकघरातली उपकरणं अशा अनेक गोष्टी येतात. त्यातून घरं, कार्यालयं, कारखाने, रेल्वे, बस स्टेशन्स, विमानतळ, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, शाळा/कॉलेजेस अशा अनेक ठिकाणी कार्यरत असलेले रोबोजही या आयओटीला जोडले गेले असतील, तर यात आणखीनच धमाल येणार आहे!

मात्र, आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला जोडलेली जातात, ती स्मार्ट असावी लागतात. म्हणजे यातल्या प्रत्येकामध्ये सेन्सर्स आणि एम्बेडेड सिस्टिमसाठी लागणारा प्रोसेसर, मेमरी आणि फर्मवेअर याही गोष्टी असाव्या लागतात. याचं कारण आज एम्बेडेड सिस्टिममध्ये आपण त्या उपकरणाजवळ जाऊन त्यांना सूचना किंवा आज्ञा देतो. (उदाहरणार्थ, वॉशिंग मशीनजवळ जाऊन ते सेट करून चालू करणं किंवा टीव्हीचा किंवा एसीचा रिमोट त्यांच्या जवळूनच; पण काही फुटांवरून वापरणं.) मात्र, यांना आयओटी म्हणत नाहीत. याचं कारण ही उपकरणं एम्बेडेड असली, तरी त्यांना सूचना दुरून इंटरनेटमार्फत दिलेल्या नाहीयेत. आयओटीमध्ये मात्र याच सूचना किंवा आज्ञा आपण आपल्या मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून दूरवरूनही देऊ शकतो. या सूचना मग त्या उपकरणाच्या मेमरीत साठवल्या जातात आणि मग तिथल्या एम्बेडेड सिस्टिमप्रमाणे त्या सूचना किंवा आज्ञा यांचं पालन होतं. (उदाहरणार्थ, पंखा किंवा एसी चालू/बंद करणं, मायक्रोव्हेव ओव्हन चालू/बंद करणं...)
अलीकडच्या एका जाहिरातीत अमिताभ बच्चन घरापासून खूप दूर असताना त्याच्या घरी टपकलेल्या पाहुण्यांना खूप उकडायला लागतं. मात्र, एसीचा रिमोट हरवलेला असतो. हे अमिताभला कळल्याबरोबर तो दूरवरूनच आपल्या मोबाईलच्या मदतीनं तो घरातला एसी चालू करतो, आणि सगळे खूश होतात. ही "वाय-फाय एसी'ची जाहिरात म्हणजे आयओटीचंच उदाहरण होतं.

उद्याच्या जगात कॉम्प्युटर्सचं स्वरूप खूपच बदलेल. झेरॉक्‍स कंपनीच्या एका शोधनिबंधाप्रमाणे उद्याच्या जगात कॉम्प्युटर्स हे खूपच लहान आणि शक्तिमान झाले, तरी ते वेगवेगळ्या रूपांत उपलब्ध होतील. "टॅब्ज, पॅड्‌स आणि बोर्डस्‌' अशा विविध स्वरूपांत ते दिसतील. कार्यालयाच्या किंवा घराच्या प्रत्येक खोलीत साधारणपणे 100 टॅब्ज, 10 ते 20 पॅड्‌स आणि 1-2 बोर्डस्‌ असतील, असा एक अंदाज आहे. "टॅब' हा एक इंच लांब असा एक संगणकच असेल. कर्मचारी तो सतत आपल्या जवळ ठेवतील. या टॅब्जपासून "इन्फ्रोरेड'चे सिग्नल्स इमारतीतल्या एका मोठ्या संगणकाकडं सतत पाठवले जातील. यावरून त्या क्षणी प्रत्येक कर्मचारी नक्की कुठं आहे ते कळू शकेल आणि ते त्या मोठ्या संगणकाच्या स्क्रीनवर दाखवताही येईल. यामुळे कर्मचारी ऑफिसच्या वेळेत बाहेर पान खात फिरत असेल, तर ते लगेच कळेल. तसंच यामुळे ऑफिसमध्येच वारंवार भेटून वाढणारी प्रेमप्रकरणं यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल, हे प्रेमिकांच्या दृष्टीनं वाईटच.. यामुळे आपलं आयुष्य मॅनेजमेंट-नियंत्रित असण्याच्या भावनेतून लोकांमध्ये असंतोषही कदाचित पसरेल! एवढंच काय, या तंत्रज्ञानामुळे आपल्या मुला-मुलीचा नेमका ठावठिकाणा आई-वडिलांना बसल्या बसल्या कळू शकेल.

आयओटीमुळे उद्याच्या जगात हे टॅब्ज एकमेकांमध्ये संवाद साधू शकतील आणि महिती एका ठिकाणाहून दुसरीकडे लीलया पाठवू शकतील. शेवटी तर हे टॅब्ज आपल्या शर्टाच्या बटनापेक्षाही लहान होतील आणि त्यांनाच ती अडकवून फिरता येईल! "पॅड्‌स' टॅब्जजेक्षा थोडी मोठी म्हणजे-संगणकाच्या स्क्रीनसारखी असतील (उदाहरणार्थ आयपॅड); पण तीही कालांतरानं पातळ होत होत अगदी कागदासारखी बनतील! आपल्या "रफ पेपर'सारखी अनेक पॅड्‌स ही कार्यालयांत आणि घरात पडलेली असतील आणि ती एका मोठ्या संगणकाला जोडलेली असतील. "स्मार्ट पेपर'ची ही सुरवातच म्हणावी लागेल. आपण त्यावर काहीही खरडलं, तरी त्यातली अक्षरं आणि आकृत्या समजून घेऊन तो स्मार्ट पेपर "सुवाच्य' अक्षरांत सगळं संगणकावर साठवून ठेवेल. तो फक्त स्पेलिंगच नव्हे, तर व्याकरणही दुरुस्त करील. "बोर्डस्‌' हे भिंतीवर टांगण्याचे थोडेसे मोठे संगणक असतील. "व्हिडियो कॉन्फरन्सेस'साठी ते वापरले जातील. यांचाच वापर करून डॉक्‍टर्स एका ठिकाणी बसून हजारो मैल दूर असलेल्या पेशंटवर शस्त्रक्रियाही करू शकतील! या सगळ्या टॅब्ज, पॅड्‌स आणि बोर्डस्‌मध्ये कोट्यवधी घरं, कार्यालयं, वाहनं, कारखाने, रस्ते आणि इमारती इथं असणारी यंत्रं, रोबोज, सेन्सर्स आणि उपकरणं (डिव्हायसेस) यांची भर पडेल, आणि ती सगळी एकमेकांशी आणि सगळ्या माणसांशी इंटरनेटद्वारा जोडली जाऊन जे एक अगडबंब, अजस्र नेटवर्क तयार होईल ते म्हणजेच आयओटी!! "इंटरनेट ऑफ थिंग्ज'लाच "इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग्ज'असंही म्हटलं जातं.

आयओटीचा आणि "जावा' या प्रॉग्रॅमिंग भाषेचा खूप जवळचा संबंध आहे. टीव्हीला आज्ञा देऊन नियंत्रित करता यावं, त्यावर आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे तो सिनेमा बघता यावा म्हणजेच "व्हिडियो ऑन डिमांड' या कल्पनेतूनच "जावा'चा जन्म झाला. आपण त्याविषयी नंतर बोलूच.

अशी कल्पना करा, की एखाद्या घरात सगळी उपकरणं एकमेकांशी आणि आपल्याशी इंटरनेटद्वारे जोडली गेलेली आहेत आणि ती आपल्या सगळ्या आज्ञा पाळताहेत. उदाहरणार्थ, कल्पना करा, की आपण आपल्या उपकरणांमध्ये असे प्रोग्रॅम्स टाकलेले आहेत, की योग्य वेळी गजर वाजून आपण जागे होतो. जागे झाल्यावर आपोआप गॅस चालू होतो. त्यानंतर त्यावर कॉफीसाठी ठेवलेलं पाणी उकळायला लागतं. कॉफी तयार होईपर्यंत दुसरीकडे ठेवलेला कॉम्प्युटर आपल्याला आपला त्या दिवसाचा प्रोग्रॅम, त्या दिवशी असलेली कामं आणि मीटिंग्ज एकापाठोपाठ एक वाचून दाखवतो. त्याचबरोबर आपल्याला आलेले मेसेजेस तो वाचून दाखवतो आणि आपण त्या मेसेजेसना तोंडी दिलेली उत्तरं तो आपोआपच ठराविक लोकांना ई-मेल किंवा व्हॉईस मेल या स्वरूपात पाठवून देतो. आपण एखाद्या खोलीत शिरल्याबरोबर तिथले दिवे चालू होतात; तोपर्यंत ते बंद असतात. त्यानंतर त्या खोलीतला टीव्ही आपोआप चालू होतो आणि आपलं आवडतं चॅनेल सुरू होतं. आपल्याला बातम्या ऐकायच्या असतील, तर आपोआप बातम्या कळतात. आपण नंतर गाडीत बसतो; त्या गाडीला ड्रायव्हर नसतो. आपल्याला जिथं जायचं असेल, तिथं सगळ्यात चांगल्या, जवळच्या मार्गानं आपल्याला ती गाडी आपोआप पोचवते.

आपण ऑफिस संपल्यानंतर पुन्हा अर्थातच ड्रायव्हर नसलेल्या कारमधून घरी येतो; पण घर गरम असेल आणि आपण यायच्या आधी आपल्याला ते थंड करायचं असेल आणि जेवण मात्र गरम तयार पाहिजे असेल, तर आपण घरी यायला निघाल्यावर गाडीतूनच इंटरनेटच्या माध्यमातून घरच्या पाहिजे त्या उपकरणांना तोंडी सूचना देतो. त्याबरोबर घरातला एसी आपोआप चालू होतो आणि रेफ्रिजरेटरमधले जे काही पदार्थ आपण जाताना मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवले होते ते गरम व्हायला लागतात. आपण परत घरी पोचेपर्यंत घर थंड झालेलं असतं, आपल्यासाठी गरम जेवण तयार असतं आणि पुढच्या इतर अनेक गोष्टींची तयारी झालेली असते. या सगळ्या काळात घरातली आर्द्रता, घरातला धूर, तापमान, धूळ आणि प्रदूषण वगैरे गोष्टींची सतत मोजमापं होत असतात आणि कुठलीही गोष्ट वाजवीपेक्षा कमी-जास्त झाली, तर आपल्याला त्याचे संकेत ताबडतोब मिळत असतात. हे चित्र आज आपल्याला सायन्स फिक्‍शन वाटेल; पण त्यातल्या काही गोष्टी अगोदरच प्रत्यक्षात आलेल्या आहेत. उद्याच्या जगात जेव्हा घरकामासाठी अनेक रोबोज घरी वावरायला लागतील, आणि तेही इंटरनेटला जोडले गेल्यामुळे आयओटीमध्ये सामील झाले असतील, तेव्हा कॉफीसाठी पाणी गॅसवर ठेवणं, पाणी उकळल्यावर त्यात दूध, साखर आणि कॉफी टाकणं आणि ती ढवळून आपल्याला हातात ठेवून "यूवर कॉफी सर' असं म्हणणं किंवा जेवणाची वेळ झाली, की फ्रीजमधल्या सेन्सर्सनी रोबोला सूचना देणं आणि त्यानंतर फ्रीजमधलं अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये त्या रोबोनं ठेवणं आणि नंतर ते वाढणं हे नियमितपणे होऊ शकेल. या आयओटीमुळे उद्याच्या जगात दर काही दिवसांमध्ये फ्रीजमधल्या संपलेल्या गोष्टींची ऑर्डर फ्रीजमधली ही एम्बेडेड सिस्टिम आपोआप थेट जवळच्या मॉलला किंवा बिग बास्केटमधल्या वेबसाईट देईल.
खेळाच्या क्षेत्रातही आयओटी शिरलंय. राल्फ लॉरेन नावाची कपडे बनवणारी एक अमेरिकन कंपनी आहे. त्यांनी आयओटीचा वापर खेळाडूंसाठी खूप कल्पकतेनं केला. त्यांनी खेळाडूंसाठी खास स्मार्ट शर्टस्‌ बनवले आहेत. त्या शर्टवर अनेक सेन्सर्स बसवले आहेत. त्यामुळे दर क्षणी त्या खेळाडूंचा हार्ट रेट, श्वासोच्छ्वासाची गती, रक्तदाब, पळालेलं अंतर, बर्न झालेल्या कॅलरीज अशा सगळ्यांची मोजमापं घेतली जातात आणि ती त्या खेळाडूच्या आणि पाहिजे असेल, तर त्याच्या कोचच्या किंवा डॉक्‍टरच्या मोबाईलवरपणही दिसू शकतात.

उद्याच्या मोटारीचे वेगवगळे भागही मोठ्या नेटवर्कमधून मोटारीच्या कंपनीला जोडलेले असतील, तिथला संगणकच त्यांच्यावर नियंत्रण ठेवील. समजा, त्यातला कुठला भाग थोडा कमकुवत झाला असेल, तर ते त्या मोटारीचा कंपनीच्या संगणकाला लगेच समजेल आणि तो संगणकच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ती मोटार कुठं आहे हे सॅटेलाईट्‌सच्याद्वारे ठरवेल आणि जवळात जवळच्या गॅरेजचा पत्ता आणि त्यांचा फोन नंबर तुम्हाला तुमच्या मोटारीच्या संगणकावर दाखवेल आणि तिथं कसं पोचायचं हेही सांगेल. तुम्हांला हवं असेल, तर संगणकच मग त्या गॅरेजमध्ये तुमची पुढच्या अर्ध्या तासानंतरची वेळ ठरवून तुम्हाला कळवेल!

Web Title: achyut godbole write computer network article in saptarang