

Drone Technology
esakal
ड्रोनची खरी ताकद अलीकडच्या काळात युद्धभूमीवर प्रकर्षानं दिसून आली. रशिया-युक्रेन युद्धानं जगाला दाखवून दिलं, की आता युद्ध जिंकण्यासाठी फक्त कोट्यवधींच्या लढाऊ विमानांची गरज नाही. काही लाखांचे ‘कामीकाझे’ किंवा सुसाइड ड्रोन्स शत्रूच्या मोठ्या टँक्सना एका फटक्यात उद्ध्वस्त करू शकतात.
ड्रोन्स हा एक धमालच प्रकार आहे. एकेकाळी स्वप्नवत वाटलेले ड्रोन्स आता हवेत चक्क उडताना दिसतात. युद्धामध्ये गुप्त हत्यार म्हणून जरी ड्रोन्सची सुरुवात झाली असली तरी आता जगामध्ये अनेक कामांसाठी ड्रोन्स वापरले जातात.