
गौरी देशपांडे-gaurisdeshpande1294@gmail.com
आजी म्हणते की, मी म्हणजे अगदी हुबेहूब माझी आईच! तेच चाफेकळी नाक, भोकरे डोळे आणि दाट, लांब केस. अशा आई आणि मी. आवळ्या- जावळ्या. मी आणि आई - जावळ्या- आवळ्या. ही ‘मी’ म्हणजे आपली आद्या! त्या दिवशी आद्या आणि तिची कुत्री ‘निमकी’ खिडकीकडे डोळे लावून बसले होते, आईची वाट बघत! त्या दिवशी आई परत येणार होती ना हॉस्पिटलमधून! एक-दोन दिवसांनी नाही, तर तब्बल काही आठवड्यांनी!