
अशोक कोतवाल - saptrang@esakal.com
अहिराणी ही बोलीभाषा ओव्या, म्हणी आणि अनेक वाक्प्रचारांनी समृद्ध आहे. अहिराणीत ‘छ’ आणि ‘ण’ ही व्यंजने नाहीत. रूपविचारात मराठीतील ‘ला’ या प्रत्ययाऐवजी ‘ले’ हा प्रत्यय आहे. जसे आम्हाला- आम्हले, गावाला- गावले, घराला- घरले. याशिवाय आणखी असे अनेक प्रत्यय आहेत जे मराठीला अपरिचित आहेत. लेवापाटीदारी, तावडी, भिलाऊ, गुजरी आणि पावरी या पोटभाषा असलेल्या अहिराणीविषयी...